मुख्य पान

बुद्ध धर्माच्या प्रतिक्रियेत महाभारत लिहिल्या गेले, डॉ. विलास खरात यांचा खुलासा

नागपुर/दै.मू.वृत्तसेवा
इतिहासकार लोकांचे म्हणणे आहे कि महाभारत काल्पनिक आहे. पूश्यमित्र शूंगद्वारा राज ब्रहदरथची हत्या केल्यांनतर गुप्त काळापर्यंत महाभारत लिहिण्याचे काम सुरूच होते. महाभारतात बुद्धांचा 137 वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे बुद्ध धर्माच्या प्रतिक्रियेत महाभारत लिहिल्या गेले, हा याचा पुरावा आहे, असा खुलाचा राष्ट्रीय मॉयनॉरिटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी डॉ. विलास खरात यांनी केला. ते नागपुर येथे संपन्न झालेल्या बामसेफ आणि भारत मुक्ति मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशान बोलत होते.
आज ज्या विषयांवर चर्चा केली जात आहे कि ज्यामुळे भारतातील ब्राह्मणांचे वर्चस्व मन आणि मेंदूवर आहे.अशा बाबींना उजागर केले जात आहे कि ज्यामुळे त्यांच्या डोळयावरची पट्टी उघडेल. यामध्ये एक महत्वपूर्ण मुद्दा हा आहे कि महाबोधी महाविराच्या प्रांगणातच जगननाथ मंदिरासोबत इतर ब्राह्मणी प्रतिकांची स्थापना करना महाबोधी विहाराच्या अस्तीत्वालाच समाप्त करण्याचे एक मोठे षडयंत्र आहे. असेही ते म्हणाले.
जे आज महाबोधी महाविहाराचे जो ढाचा दिसून येत आहे, हा ढांचा 1890 मध्ये सर मेजर जनरल कनिंगहमकडून याचे खोदकाम केले गेले. कारण की अनागारिक धर्मपाल जगातील बुद्धिष्ट राष्ट्रांच्या जागतिक परिषदे केली. जगातील बुद्धिष्ठ लोकांनी, कारण की इंग्रजांची सत्ता ही केवळ भारतापर्यंतच मर्यादित नव्हती. भारताच्या संलग्न देशांतही इंग्रजांची सत्ता होती. बुद्धिष्ठ देशांवरही इंग्रजांची सत्ता होती. तर जगातील बुद्धिष्ठ लोकांनी हे निर्धारित केले कि जेथे बुद्धाने, म्हणजे ज्याला सम्राट अशोकाने संबोधी स्थळ म्हटले आहे, ज्याला आज बौद्धगया म्हटल्या जाते, गया हे सायलेंट उच्चारणामध्ये नाव नाहे. बौद्ध म्हणजे बुद्ध आणि गया म्हणजे ज्ञान. गया हे बुद्धाचे ज्ञानस्थळ आहे. असा दावा त्यांनी केला.
साल 1890 मध्ये सर जनरल कनिंगहम यांनी इस्ट इंडिया कंपनीच्या निर्देशानुसार, बौद्धगया येथे खोदकाम केले. लॉर्ड कर्जन त्यावेळी प्रमुख होते. आणि ते स्वतः यावर लक्ष ठेवत होते. कारण की महंतांचा दावा होता कि ते स्थळ ब्राह्मणांचे आहे. आणि महंत शैववादी ब्राह्मण होते. त्यावेळी अनागारिक धर्मपाल यांची डोकी फोडण्यात आली होती. त्यांची हत्या करण्याची सुद्धा योजना बनविण्यात आली होती. यामुळे हा मुद्दा विश्वस्तरिय मुद्दा बनला. बौद्ध राष्ट्रे या विरोधात उभी झालीत. तर लॉड कर्जन यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तडा लावण्याची योजना बनवीली. आणि यांनतर न्यायालयात हे प्रकरण पोहचले. मात्र न्यायालयात हे प्रकरण पोहण्यापूर्वीच 1895 मध्ये न्यायालयात हे प्रकरण पोहोचले. आणि 1890 मध्ये सर जनरल कनिंगहमद्वारे याचे खोदकाम करण्यात आले. असेही डॉ.विलास खरात म्हणाले.
खोदकामात जे अवशेष मिळाले त्या आधारे रिपोर्टमध्ये हे लिहिल्या गेले आहे कि जो बोधीवृक्ष आहे, त्याच्या खाली वज्रासन मिळाले. आणि त्याच्याजवळ जो कठडा मिळाला त्याची रचना आणि त्यावर लिहिलेले अभिलेख, हे सर्व सिद्ध करतात कि मौर्य राजा सम्राट अशोकांनी या विहाराची निर्मिती केली होती. ही बाब रिपोर्टमध्ये नमूद आहे. म्हणजे या रिपोर्टनेच निर्णय दिला होता, परंतु महंतसुद्धा दावा करत होता. तेव्हा महंतांना विचारण्यात आले कि काय तुम्ही म्हणता त्याला काय आधार आहे. तेव्हा महंत म्हाणले कि बुद्ध आमचे आहेत. मात्र आम्ही इतिहासातील बुद्धाला मानत नाहीत. आम्ही विष्णुतील बुद्धाच्या अवतार मानतो. त्याचा सिद्धार्थ गौतम बुद्ध किंवा तथागत गोतम बुद्ध यांच्यासी काहीही संबंध नाही. तो आमच्या विष्णुचा अवतार आहे. असेही ते म्हणाले.
तेव्हा इंग्रज लोकांनी अनेक पुरावे आणि साक्षीदारांना पेश केले होते. त्यात एक महत्वपूर्ण साक्ष ही आहे कि जे त्या महंतला दाखविण्यात आले, आणि त्याला बोलावण्यात आले तेव्हा त्याची बोलती बंद झाली. त्यांनी कोणत्याची प्रकारचा वादविवाद केला नाही. ती साक्ष ही होती कि न्यायालयाने एक्जीबीट 56 काहीतरी क्रमांक आहे, म्हणजे कानूनी दस्तावेज त्याला दाखवले ब्रम्हांड पुराण. ब्रम्हांड पुराणात लिहिलेले आहे कि ब्राह्मणांनी बौद्ध विहारात गेले नाही पाहिजे. असे ब्रम्हांड पुराण ब्राह्मणांना आदेश देतो. इतकेच नाही तर बुद्धाचा चेहरा सुद्धा ब्राह्मणांनी पाहू नये. हे सर्वच पापांचा प्रायचित्त आहे. मात्र केवळ बुद्धाचा चेहरा पाहिल्यानेच ब्राह्मणांना कोणतेही प्रायचित्त नाही. मात्र यामध्ये ब्राह्मणांना देहदंडाची शिक्षा आहे. म्हणजे त्यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केली पाहिजे असे ब्रम्हांड पुराणात लिहिलेले आहे. असेही ते म्हणाले.
तेव्हा मॅक फर्सन या न्यायाधिशांनी निर्णय दिला कि हे सत्य आहे. आणि पुराणात म्हटले आहे कि ब्राह्मणांनी बुद्धाचा चेहरादेखिल पाहू नये. तेव्हा आम्ही त्या न्यायाधीशांना धन्यवाद देतो कि त्यांनी साक्ष आणि पुराव्याच्या आधारे निर्णय दिला. न्यायाधीश म्हाणले कि आम्हाला बौद्धगया या स्थळाला ब्राह्मणांच्या कब्जातून यासाठी मुक्त केले पाहिजे. जो हश्र जगननाथपुरीचा झाला, ते सम्राट अशोकांद्वारो बनविले गलेले बुद्ध विहार आहे. ज्या प्रकारे त्यांनी जगननाथपुरी येथील मंदिरावर कब्जा केला त्याच प्रकारे ते ब्राह्मण बौद्धगयावर कब्जा करू इच्छित आहेत, यासाठी आम्ही यावर निर्णय घेऊ इच्छित आहे, असे ते म्हणाले.
यामुळे ब्राह्मणांची बोलती बंद झालेली आहे. न्यायाधीशांनी पुढे फैसला देत हा संदेश दिला कि प्रश्न हा आहे कि ब्राह्मण बौद्ध धर्माला शिवी देतात, बुद्धाला शिवी देतात, चेहरा पाहनं ही त्यांना मान्य नाही, असे त्यांच्या धर्मग्रंथाल लिहिलेले आहे, मात्र ब्राह्मण बौद्धस्थळांवर ताबा का मिळवत आहेत? न्यायाधीश म्हणाले कि लोकांची श्रद्धा आणि विश्वास त्या विहारावर परंपरेसोबत आहे. ब्राह्मण त्या विहारांवर कब्जा करून, जे लोकांचे प्रेरणास्थळ आहे, जेथे लोक अधिक संख्येने जुळलेले आहेत, त्या स्थळाव कब्जा यासाठी करू इच्छितात, जेनेकरून बौद्ध लोकांना ब्राह्मण धर्माचे गुलाम बनवले जावे. यासाठीच ब्राह्मण लोकांनी बौद्ध स्थळांवर कब्जा केलेला आहे.
तेव्हा बौद्धगया या प्रकरणातील वादावर न्यायाधीशांच्या निर्णयाने हे सिद्ध झाले कि गया येथील महाबोधी विहार हे बौद्धस्थळ आहे. गयेत मुख्य विहाराच्या आत जो स्तूप होता, त्याला रंग देऊन शिवलिंग बनविण्यात आले होते. म्हणजे आतापर्यंत जेव्हा लालू प्रसाद यादव यांची सरकार होती, महाराष्ट्र आणि बिहारमधील लोक एकत्र येऊन शिवलिंग हटविण्यासाठी आंदोलन करत होते. लोकांनी विहाराच्या आत प्रवेश करून शिवलिंग हटवले. तेव्हा ब्राह्मणांनी माघार घेतली. काही लोकांना विहार कमेटीवर सदस्य बनविल्यानंतर तेही गप्प झाले. जे विद्रोह करत होते ते नंतर सदस्य झाले, नंतर चूप झाले. तर आजही ब्राह्मणांनी जे विहाराच्या आत शिवलिंग होते, ते त्यांनी बाहर बसविले. असा दावा खरात यांनी केला.
आम्ही चर्चा यासाठी करू इच्छितो कि यूनिस्कोद्वारे गयेला वर्ल्ड हेरिटेज घोषित करण्यात आले आहे. आणि त्याच्या प्रांगणातच जेवढा महाबोधी विहाराचे क्षेत्र आहे, त्याच्या अर्ध्या क्षेत्रात भींत उभी केल्याने लोक समोर जात नाहीत. कारण येथे अधिकांश श्रद्धा असणारे लोक जातात. हे शोधण्यासाठी जात नाहीत. याचा अभ्यास करण्यासाठी जात नाहीत. लोक वंदन करण्यासाठी जातात. भिंतीसमोर तेवढयाच क्षेत्रात, जेवढया क्षेत्रात महाबोधी विहार आहे, तेथे बुद्धाच्या सेकडो मूर्त्याचे स्तूप आहेत. मात्र त्यावर शंकराचार्याचे मठ असे लिहिलेले आहे. म्हणजे एएसआईनुसार तेथे बुद्धाच्या अनेक मूर्त्या आहेत. ओटीव स्तूप आहेत, स्तूप आहेत. यानंतरही कोणाचा कब्जा आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एएसआई विभाग अशा जागेचे उत्खनन करतात. नॉन ऑक्यालॉजिकल लोकांना दिसून येत आहे कि तेथे बुद्ध विहार आहे, स्तूप आहेत, ओटीव स्तूप आहेत, सेकडो मूर्त्या आहेत, यानंतरही तेथे बोर्ड लावण्यात आला आहे कि हा शंकराचार्याचा मठ आहे. दुसÚया बाजूला त्याच प्रांगणात जगननाथाचे मंदिर बनविण्यात आले आहे. जेव्हा मी 2007 मध्ये पहिल्यांदा बिहारला गेलो होतो, तेव्हा ते एकदम लहानसे खंडर होते. आता जेव्हा जातो आणि मागील वेळेस एका कार्यक्रानिमित्त बौद्धगयेला गेलो होतो आता चार मजल्यांच भव्य मंदिर बनविण्यात आलं आहे. असेही खरात म्हणाले.
बौद्धगया हे विश्व हेरिटेज स्थळ आहे. यामुळे तेथील कमेटीची जबाबदारी आहे कि ही विश्व धरोहर आहे, यासाठी येथील वातावरण खराब होऊ नये. यानंतरही तेथे जगननाथ मंदिर बनविल्या गेले आहे. जगननाथ मंदिर कुठे आहे तर पुरीत आहे. जगननाथ मंदिर एकाच ठिकाणी असलं पाहिजे. ते सुद्धा बौद्ध विहार आहे. परंतु बौद्धगयेत ही जगननाथ मंदिर बनवले गले. त्यांनी आणखी कुठे जगननाथ मंदिर बनवले तर नागपुरला लागून भंडारा जिला आहे. या जिल्हयात राजा अशोक यांनी तीन स्तूप बनविले. एका स्तूपामध्ये बुद्धाच्या अस्थी आहेत. आता आता तेथे ब्राह्मणांनी मंदिर बनवले. त्याचे नाव ही जगननाथ मंदिर आहे. म्हणजे ब्राह्मण लोक कब्जा करण्यासाठी वेग वेगळया काल्पनिक पात्रांचा वापर करत आहेत. असा हल्लाबोल त्यांनी चढवला.
मात्र आम्ही यासाठी चर्चा करत आहोत कि गया येथील व्यवस्थापन समितीत 9 सदस्य आहेत. यातील चार बुद्धिष्ठ आहेत. महाराष्ट्रातील एकही बुद्धिष्ठ व्यक्ति त्या समितित नाही. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील कोणत्याही बुद्धिष्ठ व्यक्तिला समितीत घेत नाहीत. पूर्वोत्तर भारतीतील सिलिगुडी सारख्या क्षेत्रातील लोक समितीवर घेतात आणि त्याचा रबर स्टँप प्रमाणे वापर करतात. आणि अन्य चार सदस्य ब्राह्मण असतात. पाचवा सदस्य जिल्हाधिकारी असतो. मात्र असा नियम झाला आहे कि गयाचा जिल्हाधिकारी ब्राह्मणच असला पाहिजे. कारण की 9 सदस्यांमध्ये अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो. यामुळे जिल्हाधिकारी हा ब्राह्मणच राहिल. अशाप्रकारे बौद्धगयावर ब्राह्मणांचा प्रत्यक्ष कब्जा झाला आहे. अशी टीका त्यांनी केली.
2012 मध्ये मीस्टर वांगडी या सिलिगुडी येथील एका बुद्धिष्ठ व्यक्तिने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली.याचा 1018 में निर्णय आला. चार ओळीचा निर्णय आला. न्यायाधीशांनी केवळ चार ओळीत निर्णय दिला. महाबोधी मंदिर कायदा 1948 जो बनलेला आहे, हा कायदा विहार विधानसभेने बनविलेला आहे. त्यामुळे न्यायालयाची मर्यादा आहे. न्यायालयल या कायद्यात दखल देणार नाही. तुम्ही या कायद्यात काय कमी आणि खामी आहेत, ते घेऊन या. या कायदा पूर्णपणे ब्राह्मणवादी आहे. ब्राह्मणवादाच्या वर्चस्वाच्या बाबी यात भरलेल्या आहेत. एक तर हे बुद्धिष्ठ स्थळ आहे. महाबोधी मंदिर कायद्यात क्रमांक 11 वर लिहिलेले आहे कि हे स्थळ बुद्धिष्ठ लोकांचेही आहे आणि महंत ब्राह्मणांचे देखिल आहे. त्या कायद्यात हे लिहिलेले आहे कि तेथे पिंडदान करण्यासाठी सर्वांना परवानगी देण्यात येईल. असेही ते म्हणाले.
एएसआई म्हणत आहे कि बुद्धिष्ठ स्थळ आहे, मात्र कायद्यात म्हटले गेले आहे कि ब्राह्मणांचे स्थळ आहे. बिहारमध्ये जे सरकार बनते मग ती लालू प्रसाद यांची असो कि नीतीश कुमार यांची असो, ते ब्राह्मणांचे तुष्ठीकरण करतात. दान बौद्ध राष्ट्रांकडून घेतात मात्र ब्राह्मणांचे वर्चस्व हटवत नाहीत. ही चर्चा आज यासाठी केली जात आहे कि महाबोधी विहारात बाँब विस्फोट झाला होता. यासाठी मुस्लिम युवकांना शिक्षाही झाली. मुश्रीफ साहेबांनी ‘ब्राह्मणीन बाँम्बड एण्ड मुस्लिम हँग’ या नावाचे पुस्तक लिहिले. यात त्यानी महाबोधी विहारात झालेल्या बाँब विस्फोटाचे उदाहरण देऊन एक टीप्पणी केली आहे. असेही खरात म्हणाले.
ते म्हणतात कि जगननाथ मंदिरात रथयात्रेच्या नावावर शेजारी गांव टेकाडी येथील एका कारपेंटरने आत प्रवेश केला. त्याच्या माध्यमातून कांड केल्या गेले. ही बाब एनआयए आणि एटीएसच्या तपासातून समोर आली. एक बंदा तेथे होता, त्याने आतमध्ये प्रवेश केला. कारण की हे क्षेत्र बिहारच्या सीमेला लागून आहे. त्याने रात्री 12 वाजेपासून सकाळी चार वाजेपर्यंत दिल्लीतील लोकांना कॉल केला. तेथे एक बॅग आणि एक डायरी मिळाली. एक बाँब नाही फुटला तर तो ट्रेस झाला. त्याचे सीमकार्ड मिळाले. त्याचे नंबर मिळाले. यातून माहित झाले कि दिल्लीत एक टोळी आहे, जिच्यासोबत त्याचे बोलने होत होते. तपासात ही बाब समोर आली. परंतु त्या व्यक्तिला सोडून देण्यात आले. आणि तो कोणासोबत बोलत होता ही बाब तपास करणाÚयांनी उघड केली नाही. यानंतर मुसलमानांना जेलमध्ये टाकण्यात आले. असा दावा त्यांनी केला.
परंतु मुसलमानांना जेलमध्ये का डांबण्यात आले? कारण की इस्लामिक देश आणि बुद्धिष्ठ देशांमध्ये भांडण लावले जावे. हे ब्राह्मणांचे षडयंत्र होते. तेव्हा आम्ही यासाठी चर्चा करत आहोत कि जगननाथ मंदिर सीमेवर असल्यामुळे ब्राह्मणांचा तेथे ताबा वाढत आहे. तेथून महंतची कोठी जवळच आहे. जो त्याचा पदसिद्ध सदस्य आहे. महंतच्या कोठीमध्ये 150 पेक्षा जास्त बुद्धाच्या प्रतिमा आहेत. जेव्हा कनिंगहम यांनी महंतच्या कोठीची चौकशी केली असता, त्यांनी आपल्या अहवालात लिहिले आहे कि महंतच्या कोठीमध्ये बुद्धाच्या प्रतिमा भिंतीमध्ये दाबून ठेवल्या आहेत. आणि सम्राट अशोकाचा जो स्तंभ होता तो सुद्धा तोडण्यात आला आहे. त्या स्तंभावर सम्राट अशोक यांचा अभिलेख आहे. महंत त्याचा वापर किचनमध्ये भाजी कापण्यासाठी करत आहे. असेही ते म्हणाले.
आजही महंतच्या कोठीमध्ये बुद्धाच्या 150 पेक्षा जास्त मूर्त्या आणि अभिलेख पडून आहेत. परंतु एएसआय काहीही करून राहिलेला नाही. बिहार सरकार काहीही करून राहिलेली नाही. जो गुंडा आणि आतंवादी आहे, त्याचाच त्यावर कब्जा आहे. यासाठी केवळ महाबोधी महाविहार मुक्त केले पाहिजे, हे चालणार नाही. तेथे जेवढेही बौद्ध अवशेष आहेत, त्याला मुक्त करण्यासाठी बुद्धिष्ठ संघटनांनी समोर आले पाहिजे. आम्ही यंदा तेथे घोषणा केली आणि सरकारला चेतावनी दिली. मी 25 ते 30 हजार लोकांसमोर महाबोधी मंदिर कायदा 1948 ची होळी केली. आम्ही वाट पाहत होतो कि ते आमच्यावर गुन्हे दाखल करतील. कारण कि आम्हालाही केस करायची होती कि महाबोधी महाविरावर तुमचा कब्जा का आहे, परंतु त्यांनी असे काही केले नाही. येणाÚया काळात आम्ही दोन लाख लोकांना महंतच्या कोठीवर घेऊन जाऊ. कारण की ती विरासत आमची आहे. एएसआई त्यांना सपोर्ट करत आहे. यासाठी हे प्रकरण गंभीर आहे. असा आरोप त्यांनी केला.
आज येथे क्षत्रिय बंधू आलेले आहेत. मला याचा फार आनंद होत आहे. मात्र आमचे सुखदेव सिंग गोगामेडीजी जर येथे असते, जर शत्रूंनी त्यांच्यासोबत हे षडयंत्र केले नसते तर ते आज येथे असते. आज येथे त्यांनी वाघासारखी डरकाळी फोडली असती. जसे पूर्वी डरकाळी फोडत होते. मात्र त्यांचे जबाबदार संगती येथे आलेले आहेत. मेश्राम साहेबांनी विषय ठेवला आहे कि चाणक्य आणि परशुराम हे काल्पनिक आहेत. जो कोणी ब्राह्मण या पुराव्यासह सिद्ध करेल त्यास दोन करोड रूपये बक्षीस दिले जाइल. असे का म्हणत आहोत. कारण जेवढी ही मोठे इतिहासकार आहेत, रोमिला थापर, आरएस शर्मा, मुखर्जी, देशपांडे, भांडारकर, यांनी इतिहासात लिहिले आहे कि चाणक्य जो होता तो, कौटिल्य जो होता तो चंद्रगुप्त मौर्याचा गुरू होता. त्यांनी लिहिले आणि आम्ही वाचले.आणि आम्ही मान्य केले कि मौर्य घराणे महान का झालेत? कारण कि त्याचा गुरू ब्राह्मण होता. आणि ब्राह्मणाचे नाव चाणक्य होते, असे मॉयनॉरिटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी म्हणाले.
परंतु बहुजन समाजातील विद्वान लोकांनी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता कि चाणक्य अर्थात कौटिल्य यांची जन्मतारिख काय आहे? साल कोणते आहे, कोणत्या जिल्हा आणि गांवात त्यांचा जन्म झाला? जेव्हा त्यांचा जन्म झाला असेल तेव्हा त्यांचे ताम्रपट अथवा शिलालेख असतील. आहे काही? 1908 मध्ये कौटिल्यच्या अर्थशास्त्राची स्क्रीप्ट मिळाली. उत्तर भारतात ऐवजी मद्रासमध्ये मिळाली. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा स्वतः पुरावा आहे कि चाणक्य आणि कौटिल्य हे फर्जी करेक्टर आहे. याचे काही पुरावे उपलब्ध नाहीत, असेही ते म्हणाले.
परंतु ब्राह्मणांनी चाणक्य आणि कौटिल्यला मौर्य घराण्याचा गुरू करून टाकला. केवळ हाच मामला नव्हता तर. यासाठी त्यांनी एक दंतकथा निर्माण केली. ही दंतकथा 6 शतकात ‘मुद्राराक्षस’ नावाचं एक नाटक लिहिण्यात आले. या नाटकाच्या माध्यमातून एक कहाणी बनविल्या गेली की चाणक्यचा नंद राजाने अपमान केला. त्याने आपल्या शेंडीची गाठ उघडली. आणि शपथ घेतली कि जोपर्यंत मी नंद राजाची हत्या करणार नाही तोपर्यंत शेंडीला गाठ बांधणार नाही. हे इतिहासात नाही आहे. गुप्तकाळात हे नाटक लिहिल्या गेले. याच नाटकात ही कहाणी सांगण्यात आली. यानंतर त्यांने शूद्र वंशाचा चंदगुप्त मौर्यला समोर करून राजा नंदची हत्या करण्यात आली. नाटकाय नंदला क्षत्रिय आहे तर चंद्रगुप्त मौर्यला शूद्र दाखवले. मौर्यला शूद्र म्हटले, पण चंद्रगुप्त मौर्य क्षत्रिय आहे. जे क्षत्रिय आहेत, त्यांचे 36 गोत्र असतात. आणि या 36 गोत्रात एका गोत्राचे नाव मौर्य आहे. आजही हे गोत्र क्षत्रियांमध्ये आहेत. असा दावा त्यांनी केला.
मानसिंग मौर्य जो 710 मध्ये राजस्थानचा राजा होता, तो मौर्य राज्यांचा वंशज होता. त्यांने आपल्या बहिणीच्या मुलाला वारस नेमले. त्याचे बप्पा रावल असे नाव होते. हाच बप्पा रावल नंतर सिसोदिया वंशाचा प्रमुख सांगितला गेला. सिसोदिया वंशासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जोडल्या गेले आहे. ते क्षत्रिय होते. परंतु ब्राह्मणांनी नाटकात सीमाच ओलांडली. त्यांनी काय म्हटले, नंदची मुरा नामक एक दासी वेश्या होती. या नाटकाला तथाकथित इतिहासकारांनी इतिहास मानले. चंद्रगुप्त मौर्याला शूद्रच म्हटले नाही तर, एक दासीपूत्र होता, एक वेश्या होती, त्यांना अनैतिक पूत्र सांगितले. त्यांचा अपमान आणि चरित्रहणन केले. आणि मग एक म्हण तयार करण्यात आली. जी आजही बोलली जाते. शिवाजी महाराजांच्या काळातही बोलल्या जात होती. जोपर्यंत क्षत्रिय ब्राह्मणांना आवाहन देत राहिले तोपर्यंत त्या क्रांतिकारी क्षत्रियांची नावे घेतल्या जात राहिली. ती म्हण अशी कि ‘नंद अंतम, क्षत्रिय अंतम’. असे ते म्हणाले.
नंदची हत्या चंद्रगुप्त मौर्याने केली, आणि चंद्रगुप्त मौय मुरा नामक महिलेचा दासीपूत्र होता, म्हणजे शूद्र होता.शूद्राने एक क्षत्रियाची हत्या केली. केवळ कल्पना करून त्यांनी दोन साध्य मिळवले. जे क्षत्रिय आहेत त्यांचा शूद म्हणून अपमान केला आणि त्यांचे चरित्रहणन केले. नंद क्षत्रिय राजा होता. त्याचाही अंत करण्यात आला. ज्या ज्या क्षत्रिय राज्यांनी त्यांच्या काळात ब्राह्मणांना आवाहन देण्याचे काम केले, ब्राम्हणांनी हीच म्हण सांगितली कि ‘नंद अंतम, क्षत्रिय अंतम’. नंदची हत्या मौर्याकडून करणे ही बाब खोटी अनहिस्टॉरिकल आहे. मौर्य आणि नंद यांच्यात कोणतीही लडाई झालेली नाही. परंतु प्राचिन भारताच्या इतिहासचं पहिलचं पान मौर्यांचे चरित्र हनन करून काल्पनिक चाणक्य थोपवला. असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
सध्या एक मोठे इतिहासकार आलेले आहेत. ते मोठे आर्कियोलॉजिस्ट आहेत. त्यांनी दावा केला आहे कि चाणक्य काल्पनिक आहे. जर चाणक्य मौर्यांचे आदर्श होते तर सम्राट अशोकाच्या शिलालेखात त्यांचा उल्लेख मिळाला असता. परंतु चाणक्याचा कुठेही उल्लेख मिळत नाही. मौर्यांची लिपी पाली आहे तर चाणक्याचं काव्य फर्जी आहे. जे काही षडयंत्रकारी आहे ते सर्व संस्कृतमध्ये आहे. मौर्यांनी आपल्या अभिलेखात समता, स्वातंत्र आणि न्यायाचा संदेश दिला आहे. त्यांनी कुठेच वर्णव्यवस्था, उचनिचतेचे समर्थन केलेले नाही. चाणक्य कौटिल्यांचं अर्थशास्त्र म्हणते कि जे ब्राह्मणांच्या वर्चस्वाला आवाहन देतात त्यांना साम, दाम दंड, भेद या नितीचा वापर करून मारले पाहिजे, हाच धर्म आहे. म्हणून वर्णव्यवस्थेचा समर्थक मौर्यांचा आदर्श कसा असू शकतो? यामागे ब्राह्मणांचे हेच षडयंत्र आहे कि ब्राह्मणाला गुरू दाखवा, आणि त्याचे क्रेडिट ब्राह्मणांना द्या. या आधारे ते काल्पनिक आहे, असेही खरात म्हणाले.
आम्हाला 8 शतकातील एक काव्य मिळाले आहे. त्यात कवीने स्वतः लिहिले आहे कि चाणक्य काल्पनिक पात्र आहे. त्याने हे स्वतः मान्य केले आहे. आमच्यासमोर जे-जे आले ते सर्व काल्पनिक आहे. पूणे येथे पी.वी.काने नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. ज्याने ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यात काने यांनी लिहिले कि जरी ब्राह्माणांचा चाणक्य विद्वान असला तरी ब्राह्मणांच्या कुटुंबात चाणक्य किंवा कौटिल्य असी नावे ठेवत नाहीत. कारण की हा शब्दच घृणासूचक आहे. चाणक्य म्हणजे चलाख, चतूर. कौटिल्य म्हणजे कुटील. आता कोण असे म्हणणार की मी चलाख, चतुर आणि कुटील आहे. ब्राह्मणांना याचा वास्तवीक अर्थ माहित आहे, त्यामुळे ते आपल्या मुलांची नावे चाणक्य आणि कौटिल्य ठेवत नाही. ही नावे काल्पनिक आहेत. अशी टीका त्यांनी केली.
दुसरा पात्र परशुराम आहे. त्याचीही स्थिती असीच आहे. ब्राह्मणांच्या घरी जन्माला आलेल्या मुलांचे नावही परशूराम ठेवले जात नाही. आर्श्चयाची गोष्ट अशी की जर परशूराम महान आहे तर ब्राह्मण आपल्या मुलांचे असे नाव का ठेवत नाही? परशूराम पात्र कोठून आले? हे क्षत्रियांना समजून घेणे गरजेचे आहे. कारण की परशूरामचा उल्लेख महाभारतात 131 वेळा येतो. महाभारतातील मुख्य नायक कृष्ण नाही, कौरव आणि पांडवही नाहीत. कारण की नंतर हे तिनही लोक मरतात. जर नायक असते तर जीवित राहिले असते. ज्या बाबी ब्राह्मणांनी लपविल्या त्या उघड करण्याचे काम अमेरिकेतील इतिहासकार फिज गहरॉल्ड यांनी केले आहे. त्यांनी 11 खंडात महाभारताचे भाषांतर केले आहे. इतिहासकार लोकांचे म्हणणे आहे कि महाभारत काल्पनिक आहे. पूश्यमित्र शूंगद्वारा राज ब्रहदरथची हत्या केल्यांनतर गुप्त काळापर्यंत महाभारत लिहिण्याचे काम सुरूच होते. महाभारतात बुद्धांचा 137 वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे बुद्ध धर्माच्या प्रतिक्रियेत महाभारत लिहिल्या गेले, हा याचा पुरावा आहे. असेही ते म्हणाले.
मात्र इतिहासकार असे म्हणतात कि मनुस्मृतिने ब्राह्मणांना शस्त्र धारण करण्यावर प्रतिबंध घातला आहे. ब्राह्माणांच्या काय़द्याची पुस्तक मनुस्मिती मध्ये ब्राह्मणांना शस्त्र धारण करण्यास मनाही आहे. त्याच्या आपाद धर्मामध्ये लिहिले आहे कि जर ब्राह्मणांच्या वर्चस्वाला कोणी क्षत्रिय राजा आव्हान देत असेल तर अशावेही ब्राह्मणांनी शस्त्रे धारण करून त्याची हत्या करावी. अशा हत्यासाठी त्यांनी ‘वध’ या शब्दाचा वापर केला आहे. म्हणजे ही हत्या जायज आहे. इतिहासकार लोकांचे म्हणणे आहे कि जे परशुरामचं पात्र आलेले आहे ते बौद्ध धर्माच्या प्रतिक्रियेत आलेले आहे. सम्राट अशोक मौर्यला समोर ठेवून हे पात्र आलेलं आहे. महाभारत हे एका व्यक्तिने लिहिलेले नाही. यासाठी एक समीती बनविली होती. प्रतिकांच्या माध्यमातून आणि शब्दांना खेळ बनवून महाभारत लिहिल्या गेले आहे. बहुजन समाजातील लोक शब्दार्थ समजतात, व्यंगार्थ समजत नाहीत, असेही खरात म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!