नळदुर्ग शिवारात विज पडुन दोन बैलांचा मृत्यू
शासनाने पिडीत महिला शेतकऱ्यांना पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्गच्या शिवारात शेतातील रात्रीच्या सुसाट्याचा वादळ वाऱ्याच्या व विजाचा कडकडाटा सह खुप मोठा प्रमाणात पाऊसाने थैमान घातले आसुन शहरातील राष्ट्रीय हायवेवर मोठ मोठी झाडे उखडुन कोसळली हा प्रकार रात्री २ ते २ः ३० दरम्यान झला
नळदुर्ग येथील संगीता दयानंद बनसोडे विधवा शेतकरी महिला आसुन त्यांच्या शेतात दोन हनम्या व सर्जा नावाच्या बैलांची जोडी होती त्या बैल जोडीचा विज पडुन जागीच मृत्यू झाला आहे याची अंदाजा किमती २ लाखांच्या पुढे होती संगीता दयानंद बनसोडे ही पिडीत विधवा महिलां आसल्याने शासनाने पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी आशी मागणी जोर धरत आसुन शासनाने या पिड़ीत महिला शेतकऱ्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याना तात्काळ मदत माळावी या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
घटना स्थळाचा पंचनामा मंडलाधिकारी जयंत गायकवाड तलाठी व्ही व्ही वायचाळ कर्मचारी फुलारी यानी घटनास्थळी भेट दिली आसुन देऊन पंचनामा झाला आसल्याचे सांगण्यात आले .
चौकट
शेजारी प्रकाश कोकणे हे शेतात राहातात या शेतकऱ्याने विजेचा खुप मेठा कडकडाट झाला मोठा आवाज आल्याने या बैलांचा वीज पडून मृत्यू झाले असल्याचे सांगितले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत