लोकशाहीच्या उत्सवाची सुरुवात..
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात निवडणूकीच्या धर्तीवर मतदान पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडकरी, विकास ठाकरे, मुनगंटीवार, धानोरकरांसह बड्या नेत्यांचं भवितव्य इथं मतपेटीत बंद होणार आहे. तर, पूर्व विदर्भातल्या लढाईत आज फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, पटेलांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत