धाराशिव तालुका समता सैनिक दलाकडून महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांना विनम्र अभिवादन !
धाराशिव : आज दि. 16 एप्रिल 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थि स्मारक (पुतळा) येथे सकाळी ठीक 11.00 वाजता बौद्ध सम्राट,चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2328 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापुजन आणि अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दल धाराशिव तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक विजय बनसोडे व रमाई फौंडेशनचे पृथ्वीराज चिलवंत यांच्या हस्ते
यावेळी देवनाम प्रिय,प्रियदर्शी सम्राट अशोक राजा यांच्या प्रतिमेला आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सामूहिक त्रिसरण पंचशील घेतले.
या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समता सैनिक दलाचे तालुका सचिव सचिन दिलपाक यांनी केले. यावेळीयावेळी या अभिवादन कार्यक्रमास भारतीय समता सैनिक दलाचे तालुका उपाध्यक्ष स्वराज जानराव,तालुका सचिव सचिन दिलपाक,सैनिक प्रतीक चंदनशिवे , सैनिक लक्ष्मण सोनवणे ,संतोष बनसोडे,वंचित बहुजन आघाडीचे आनंद गाडे,सचिन गायकवाड,सम्यक विद्यार्थी आघाडीचे यशवंत सपकाळ, अविनाश डांगे,मुकेश मोठे,सोहन बनसोडे,अतुल लष्करे,गणेश वाघमारे,लखन सोनवणे,बाळासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती.तर शेवटी सम्राट अशोक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत उपस्थित बौद्ध बांधवाना मिठाईचे वाटप करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत