लोकसभा 2024 साठी “दीदी की शपथ” – तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर “दीदी की शपथ” या नावाने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडी ने आज राज्यात आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. टीएमसीने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) रद्द करण्याचे आणि देशात समान नागरी संहिता (UCC) लागू होऊन देणार नसल्याचं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.
“जेव्हा टीएमसी इंडिया आघाडीचा भाग म्हणून केंद्रात सरकार स्थापन करेल तेव्हाच आम्ही हे सर्व करू.” सीएएआणि यूसीसी व्यतिरिक्त, टीएमसीने घोषणापत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MNREGA) अंतर्गत दैनिक भत्ता 400 रुपये प्रतिदिन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
याशिवाय दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरपोच रेशन पोहोचवण्याचे आणि 10 मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय टीएमसीने इतर अनेक कल्याणकारी योजनाही जाहीर केल्या आहेत.
पक्ष किंमत स्थिरीकरण निधी तयार करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे वचन देतो.
जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत, एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि सर्व तरुणांना रोजगार हमी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात म्हटले आहे की, देशातील सर्व गरीब कुटुंबांना मोफत घरे दिली जातील. सर्व शिधापत्रिकाधारकांना दरमहा पाच किलो धान्य मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत