धम्मरत्न देविदासराव कदम सोशल फाउंडेशनच्या वतीने भीम जयंती 2024 निमित्त भव्य शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन.
धाराशिव : मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट अशोक व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त “तुळजापूर तालुक्यातील बहुजन मुला मुलींना जागतिक स्तरावरील शिक्षणाच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्याचे फायदे” या विषयावर सावित्रीमाई फाउंडेशन धाराशिवचे आयु. किशोर भगत सर यांचे सविस्तर व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष आयु. विश्वासभाऊ हे होते.
चव्हाण सर व हनुमंते मॅडम यांच्या स्वागत गितानंतर व आर्या पांडागळे या विद्यार्थिनीने इंग्रजीत भाषण केले व प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनात प्रोजेक्टर वरून फोटो आणि माहिती द्वारे आयु. किशोर भगत सर म्हणाले की, “जगाला गवसणी घालण्याची ताकत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे आणि आता बहुजन वर्गाने स्वस्थ न बसता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आत्मविश्वासाने व जिद्दीने पुढे येण्याची गरज आहे. व तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सावित्रीमाई फाउंडेशन -शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, विदेशी भाषा इत्यादी सर्व अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य करण्यास आनंदाने तयार आहे.” असे सांगितले.
कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते आयु. आनंद पांडागळे, मिलिंद रोकडे आणि जयंती उत्सव समिती अध्यक्ष आयु. उत्तम कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा सत्यशीला विक्रांत कदम, सहसचिव बाबासाहेब वडवे, सदस्य जीवन कदम, भारतीय बौद्ध महासभेचे आयु. सुकेशन ढेपे, कुमार ढेपे, अनिल सरतापे, राजश्रीताई कदम, अप्सराताई कदम, माधुरी नागटिळक, उषाताई माने, रामेश्वर चंदनशिवे, विठल सुरते, विलास सरवदे, हणमंते मॅडम, वडवराव सर, करडखेले सर, सुनील लोंढे सर, चव्हाण सर, संजय चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुकेशन ढेपे यांनी तर आभारप्रदर्शन आयु. बाबासाहेब वडवे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तुळजापूर शहर व तालुक्यातील विद्यार्थी आणि सुजाण पालक तसेच विविध शाळेतील शिक्षकगण उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत