नरेंद्र मोदी यांनी केली आचारसंहिता भंग; 6 वर्षांसाठी निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्याची मागणी – दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली : लोकसभा 2024 च्या रणधुमाळी मध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. देशाचे प्रधानमंत्री ही प्रचारात व्यस्त झाले आहेत. ९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेश च्या पिलीभीत मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देव आणि धार्मिक स्थळाच्या नावावर मोदी यांनी मत मागितल्यामुळे त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल आहे आणि असे केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आनंद एस. जोंधळे यांनी सदर याचिका दाखल केली आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द ठरविण्यात आली होती, हा इतिहास आहे. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशाच प्रकारचा एक आरोप झाला असून थेट दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
९ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी पिलीभीत याठिकाणी दिलेल्या भाषणाचा हवाला दिला आहे.
जोंधळे यांनी आपल्या याचिकेत दावा केला की, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू धार्मिक
स्थळाच्या नावावर तसेच शीख देवता आणि शिखांच्या
धार्मिक स्थळाच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न केला. देशात राम मंदिर झाले पण आग लागली नाही’, असे वक्तव्य केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचार संहिता भंग केली आहे त्यामुळे त्यांच्यावर 6 वर्षे निवडणूक काढण्यावर बंदी घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत