मांस खाण्याबद्दल बोलणाऱ्या मोदींना मांस विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून इलेक्टोरल बॉण्ड कसे चालतात ? – खासदार असदुद्दीन ओवेसी.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा 2024 च्या निमित्ताने खासदार असदुद्दीन ओवेसी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. लोकसभेच्या रिंगणात एमआयएम पक्षातर्फे खासदार इम्तियाज जलील हे उमेदवार आहेत. जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी यांची वैजापूर तालुक्यामध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मोदीं तसेच स्थानिक नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
निवडणुकीच्या दरम्यान नरेंद्र मोदी मासबंदीच्या बाबतीत जाहीरपणे बोलत आहेत. श्रावण महिन्यामध्ये मास खाल्लं जातंय असं ते म्हणतात. मात्र मी ३० दिवस रमजान महिन्यामध्ये रोजा पकडतो. त्या काळामध्ये तुम्ही जेवण करू नका असं मी म्हटलं तर तुम्हाला चालेल का? मांस खाण्याबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मांस विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून दिलेले इलेक्टोरल बॉण्ड कसे चालतात? असा रोकडा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत