दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

प्रज्ञासूर्य आणि त्यागमुर्ती चा मंगलविवाह.. विरह, वेदना आणि समाजहिताचा अखंड प्रवाह..!


आज 4 एप्रिल !
1906 ला आजच्याच दिनी भीमराव आणि रमा विवाहबद्ध झाले !!
दोन जीव एक झाले; पण आजीवन जगले बहिष्कृत समाजासाठीच…!
भीमाची रामू… आणि रमाईचे बाबा !
दोन शरीर एक मन… पण विरह कायम ! बाबासाहेब सातासमुद्रापल्याड ज्ञानसाधनेत व्यस्त असताना रमाईने गोव-या विकून पार पाडलेल्या कौटुंबिक जबाबदारीला जगाच्या इतिहास तोड नाही.
विरहाच्या वेदना सोसत रमाई भीमाची सावली झाली नसती तर आजही गावकुसाबाहेरील शोषितांची वस्ती शापितच राहिली असती !
दोघेही शेवटच्या श्वासापर्यंत पणतीत तेल होऊन जळाले नसते तर आजही अंधारवस्त्या प्रकाशमान झाल्या नसत्या !!

एका अजोड , आदर्श , त्यागाचं दुसरं नाव असलेल्या या दांपत्याला कोटी कोटी प्रणाम !!!

जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!!


संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!