आयआयटी मुंबई मध्ये ही बेरोजगारीची झळ ? -प्लेसमेंट ची टक्केवारी घसरली; शेकडो विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत
मुंबई : देशातील नामांकित प्रतिष्ठित अशा शिक्षण संस्थांनामध्येही कठोर परिश्रम करणाऱ्या उच्च विद्याविभूषित विद्यार्थ्यांना ही आता बेरोजगारीच्या झळा सोसाव्या लागत आहेत अस चित्र आहे.
दरवर्षी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी (IIT) मधील विद्यार्थी प्लेसमेंट सीझनकरता उत्सुक असतात. मोठमोठ्या कंपन्या येऊन विद्यार्थ्यांची मोठया पॅकेज वर निवड करतात आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होते.
मात्र यंदा IIT-Bombay मध्ये, २०२४ च्या प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या सुमारे २,००० विद्यार्थ्यांपैकी ७१२ म्हणजेच सुमारे ३६ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकऱ्या मिळवलेल्या नाहीत. प्लेसमेंट हंगाम अधिकृतपणे मे पर्यंत संपणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.
संस्थेचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल IIT चे माजी विद्यार्थी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंग यांनी शेअर केलेल्या IIT प्लेसमेंटवरील डेटामधून हि माहिती समोर आली आहे.
सिंह यांनी विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करण्याची गरज दर्शविली आहे. अशा परिस्थिती मुळे विद्यार्थी व स्टाफ यांची चिंता आणि तणावाची पातळी वाढू शकते व परिस्थिती आणखी खराब होऊ शकते त्यामुळे संस्था प्रशासनाने तात्काळ कांहीं उपाय योजना करणे व कंपनी व्यवस्थापकांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे असे ते म्हणाले, संस्थेकडे “फेज दोनमध्ये न सोडलेल्या सुमारे ७५० विद्यार्थ्यांसाठी क्वचितच प्लेसमेंट उपलब्ध आहे”. “भारतातील तिसरे अभियांत्रिकी महाविद्यालय (NIRF) नुसार IIT-Bombay मधील ही निराशाजनक स्थिती आहे. प्रशासनाने या विद्यार्थ्यांना त्यांना नोकरी शोधण्यात कशी मदत करणार आहे याची माहिती दिली पाहिजे,” असे मत सिंग यांनी व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत