संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी – के सी वेणुगोपाल यांच्या सहीने पत्र
मुंबई: पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने मुंबई मधील उत्तर भारतीय चेहरा असलेले संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
संजय निरुपम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचे वक्तव्य केले होते तसेच लोकसभा 2024 च्या जागा वाटपाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने व काँग्रेसबद्दलही पक्षविरोधी वक्तव्य केल्याने काँग्रेसने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेस च्या स्टार प्रचारक यादीतूनही त्यांना वगळण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला दिल्याने संजय निरुपम नाराज होते. या जागेबाबत पुन्हा विचार करावा यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाला ७ दिवसांचा कालावधी दिला होतो. कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडणार असल्याची घोषणा केली होती. आता पक्षानेच त्यांची हकालपट्टी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत