
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजला गंगेत पवित्र डुबकी घेत होते..
गंगाविहारचा आनंद घेत होते..
सारा गोदी मिडिया त्यांच्या मागे धावत होता..
पंतप्रधान डुबकी कशी घेतात याचं रसभरीत वर्णन करीत होता..
त्याच वेळेस अमेरिकन लष्कराचं एक विमान अमृतसरच्या गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँन्ड होत होतं…
कोणताही स्वाभिमानी देश परकीय लष्करी विमानाला आपल्या भूमीवर उतरण्याची अनुमती देत नाही.. तसं करणं देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान मानलं जातं..
या संदर्भात कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी दाखविलेला बाणेदारपणा जगाच्या नजरेत भरावा असाच होता.. अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणारया कोलंबियन नागरिकांना घेऊन जेव्हा अमेरिकन लष्करी विमान निघाले तेव्हा गुस्तावो पेट्रो यांनी ते विमान आपल्या भूमीवर उतरण्याची परवानगी नाकारली.. आर्थिक निर्बंध लादण्याची अमेरिकेने धमकी दिल्यानंतरही पेट्रो जराही विचलित झाले नाहीत.. आपल्या भूमीकेवर ठाम राहिले..
आपले विमान पाठवून त्यांनी आपल्या नागरिकांना सन्मानाने मायदेशी आणले..
हा असतो राष्ट्रवाद..
हा असतो स्वाभिमान
आपण काय केलं..?
हातात बेड्या ठोकलेल्या अवस्थेत, अत्यंत अपमानीत पध्दतीने 104 भारतीयांना अमेरिकेने आज आपल्या लष्करी विमानातून भारतात पाठवून दिलं..
आपण बेशरमपणे अमेरिकेच्या लष्करी विमानाला भारताच्या भूमीवर उतरण्याची परवानगी दिली..
का?
कोलंबिया सारखा एक छोटा देश जो स्वाभिमान दाखवू शकतो, तसा स्वाभिमान भारताला का दाखवता आला नाही?
या सगळ्या विषयावर मोदी मौन बाळगून आहेत..
मोदी बोलले नाहीत, बोलत नाहीत
उलट ही बातमी भारतीयांना समजणार नाही याची काळजी घेतली गेली..जिथं विमान उतरलं तिकडं मिडियाला फिरू दिलं नाही..
शिवाय
प्रयागराज भेटीचा मुहूर्त नरेंद्र मोदी यांनी आजचा यासाठी निवडला की, मिडियाचे लक्ष अमेरिकन लष्करी विमानाच्या लँंन्डिंगकडे जाताच कामा नये..
त्यात नरेंद्र मोदी यशस्वी झाले..
मिडियावर अमेरिकन दादागिरीची नाही तर नरेंद्र मोदींच्या डुबकीचीच चर्चा दिवसभर सुरू होती..
दोन मुद्दे आहेत..
भारतीयांना परत आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी कोलंबिया प्रमाणे आपले विमान का पाठवले नाही?
अन दुसरी गोष्ट,
जंग जंग पछाडलयानंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळयास नरेंद्र मोदी यांना अमेरिकेने निमंत्रित केलं नाही, तरीही नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपले मित्र मानतात..
हरकत नाही..
पण पंतप्रधानांनी आपल्या मित्राला किमान भारतीयांना बेड्या ठोकून पाठवू नका अशी विनंती का केली नाही?
बरं नाही केली तर आतातरी अमेरिकेच्या या कृत्याबद्दल त्यांचा निषेध करण्याची हिंमत भारत दाखविणार आहे का?
जागतिक शक्ती होण्याची स्वप्न भारतीयांना दाखविणारया सरकारने आज देशाची मान शरमेनं खाली जाईल अशीच कचखाऊ भूमिका घेतली आहे..
देवयानी खोब्रागडे प्रकरण आठवतंय?
त्यांना जेव्हा अमेरिकेत अपमानित केलं गेलं तेव्हा भारतानं कठोर भूमिका घेतली..
अखेर अमेरिकेने माफी मागितली..
डॉ. मनमोहन सिंग तेव्हा भारताचे पंतप्रधान होते..
अन आज 56 इंचची भाषा करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत..
फरक हा आहे..
एस.एम.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत