भगवान बुद्धांची विचारधारा.
सुरेश भवर नाशिक
तथागतांच्या प्रवचनातील प्रश्न आणि उत्तरे
प्रश्न: आम्ही जेव्हा ध्याजन करतो तेव्हा आम्हाला शाक्य मुंनी भगवान बुद्ध दिसतात. जेव्हा आपण ध्यान करता तेव्हा आपणाला कोण दिसते?
उत्तर: आपण कशावर ध्यान एकाग्र करतो? आपण ध्यान कसे करतो? मी सुद्धा करुणा प्रेम बोधिचित्त प्रज्ञा, चार उदास सत्य अशाच गोष्टीवर ध्यान केंद्रित करीत असतो. अशांवर ध्यान एकाग्र करताना त्या व्यक्तीच्या अंतरिक गुणांच्या सानिध्यात आपण येतो. एखाद्या देवतेला किंवा श्रद्धे याला मनात ठेवून ध्यान एकाग्र करणे किंवा सामान्य तऱ्हेने ध्यान करणे यामुळे एखाद्या मोकाट हत्तीप्रमाणे सुटलेले आपले मन ताब्यात राहते. आपले मन अशा तऱ्हेने ताब्यात ठेवून आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीवर चित्त एकाग्र करून अधिक उच्च पातळीवरच्या अध्यात्मिक क्रिया आपण करू शकतो.
म्हणून सुरुवातीला आपण आपले भरकटणारे मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करून एखाद्या विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करणे हे आपले ध्येय असले पाहिजे. त्यामुळे आपले मन कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय आणि श्रमाशिवाय नितळ शुद्ध होत जाईल आणि शांत होत जाईल. ध्यानासाठी मनाची एकाग्र साधताना तुम्ही बऱ्याच गोष्टी साधन म्हणून घेऊ शकता. उदा: मेणबत्ती एखादी मूर्ती आणि काल्पनिक वस्तू इत्यादी मनाची अनेक प्रतिकात्मक मूल्य असतात आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामी त्यांचे सहाय्य होत असते
अशा तऱ्हेने कोणी विशिष्ट व्यक्ती वस्तू यांची मदत ध्यान करताना होते, पण त्यांची आवश्यकता असतेच असे नाही. महत्त्वाचे हे असते की, एखाद्या ठिकाणी आपले मन संपूर्ण एकाग्र करणे आणि मनाला भरकटून न देणे! हळूहळू आपण शांत आणि शुद्ध मनाने ध्यान करायला शिकतो आणि ते सुद्धा आपल्याला हवा तितका वेळ! अगदी अनेक दिवसापर्यंत! हे म्हणजे मनाची शांती मिळवणे आहे. एकदा का मनाच्या अशा अवस्थे चे साधन आपण प्राप्त केले की, मग कुठल्याही प्रकारचे ध्यान हे अधिकाधिक यशस्वी होत जाते.
जेव्हा आपण प्रथमच अशा तऱ्हेचा सराव करत असतो, तेव्हा आपल्याला जाणवते की, आपले मन हे एखाद्या मोकाट सुटलेल्या हत्तीप्रमाणे इकडे तिकडे बेशिस्त पणे धावत आहे आणि आपण कशावरच चित्त एकाग्र करू शकत नाही आहोत; परंतु हळूहळू सरावाने आणि प्रयत्नांनी आपले मन शांत होत जाते. मग अगदी एखाद्या साधारण वस्तूवर श्वास आणि नि श्वास यांचा अनुभव ठराविक आकडे मोजून आपण घेऊ लागतो आणि मनाचा शांतीकडे सुरू झालेला प्रवास अनुभव लागतो.
भगवान बुद्ध विचारधारा
प्रसारित: सुरेश भवर नाशिक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत