देशातील तपास यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या देशविरोधी आर्थिक कारवायांचा कसून तपास करावा- सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

मुंबई : सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागा च्या स्थापनादिनानिमित्त आयोजित 20 व्या डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानमाले चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आयु. धनंजय चंद्रचूड यांनी केंद्रीय यंत्रणांना खडेबोल सुनावले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच या यंत्रणांनी आता आर्थकि गैरव्यवहार आणि देशविरोधी कायरवायांचा समावेश असलेल्या प्रकरणांकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला हवं, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक प्रकरण CBI कडे वर्ग करण्याऐवजी सध्याच्या घडीला देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी आपल्या मनुष्यबळाचा व यंत्रणेचा प्रभावी वापर करून प्रकरण हाताळावी, आज घडीला विशेष करून अशा प्रकरणांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे की ज्यांच्यामुळे खरोखरच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो किंवा देशाविरुद्ध आर्थिक गुन्हेगारी स्वरुपाची ही प्रकरण असतात,”
“सीबीआयला भ्रष्टाचारविरोधी तपास यंत्रणा या मूळ भूमिकेच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास सोपवला जात आहे. या प्रकरणांचा तपास सीबीआयला करायला सांगितलं जात आहे. यामुळे सीबीआयवरही आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांच्या मर्यादित व्याप्तीमुळे प्रमुख तपास यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांवरच लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे,” असा सल्ला चंद्रचूड यांनी दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत