रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ₹90 च्या नाण्याचे अनावरण.
नवी दिल्ली : आज रिझर्व बँक स्थापना दिवस. भारताच्या आर्थिक उलाढाली मध्ये अत्यंत जबाबदार आणि सर्वोच्च संस्था असलेली RBI ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “द प्रोब्लेम ऑफ रुपी” या शोध निबांधवार आधारित आहे.
आज ही शिखर बँक ९० वर्षांची झाली आहे. रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 90 रुपयांचे नाणे जारी केले गेले आहे. देशात प्रथमच ९० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले असून, नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. ९० रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला ९० रुपये असे लिहिलेले आहे. तसेच त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले आहे. नाण्याच्या एका बाजूला जिथे RBI लिहिलेले आहे, त्याच्या वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. याशिवाय लोगोच्या खाली @९० चा उल्लेख आहे.
हे नाणे सामान्य नाण्यांप्रमाणे खरेदी-विक्रीसाठी वापरले जाणार नाही.
नाण्याचे वजन ४० ग्रॅम आहे. जे ९९.९ टक्के शुद्ध चांदीपासून तयार केलेले आहे. संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त ७५ रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते, त्याच पद्धतीने रिझर्व बँक ऑफ इंडिया ला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे स्मृतिचिन्ह रुपी नाणे बनविण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत