निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविदर्भ

वंचितचा तिसरा दणका !आचार संहिता भंग करण्याचा प्रयत्न करणारा भाजपचा स्टेज हटविला.

अकोला : येथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता अडवून स्टेज टाकून भाजप उमेदवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डझन भर भाजप नेत्या साठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारला जात होता. आचार संहिता केवळ इतर पक्षा साठी आहे का ? अशी विचारणा करीत वंचित कडून प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी सिव्हिजील ॲप वर तक्रार दाखल करताच निवडणुक विभागाने स्टेज काढून टाकण्याचे आदेश दिले. अकोला जिल्ह्यात हा वंचित ने दिलेला तिसरा दणका ठरला.

निवडणुक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी ३ तारखेला भाजप उमेदवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि डझन भर भाजप नेत्या साठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारला जात होता.ह्या पूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाचे साठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती. सत्ताधारी भाजपचे साठी नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले स्टेज बाबत वंचित बहुजन आघाडीने सी व्हिजील ॲप वर तक्रार दाखल केली. भाजपला जर स्टेज उभारू दिला तर आम्ही पहिली सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवनात घेवू आणि कुठलीही परवानगी घेणार नाही असा इशारा देताच निवडणुक विभागाने तातडीने स्टेज कडून टाकण्याची कार्यवाही केली.
ह्यापूर्वी फोर्स मोटर्स कडून आदर्श आचारसंहिता लागू असताना लोकमत मध्ये मोदी आणि भारतीय सैन्य दलाच्या जवानांची छायाचित्रे असलेली जाहिरात प्रकाशित केली होती. तसेच भाजप प्रचार रथ जिल्हाधिकारी कार्यालय येथे असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावर दोन्ही प्रचार रथचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा वंचित कडून भाजपला दिलेला तिसरा दणका ठरला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!