“ED ने जप्त केलेले 3000 कोटी रुपये जनतेत वाटणार “- प्रधानमंत्री मोदी यांचे पश्चिम बंगाल येथील सभेत नवीन आश्वासन
आगोदर काळया धनाचे 15 लाख द्या – उध्दव ठाकरेंचा पलटवार
कृष्ण नगर बंगाल : पश्चिम बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा ‘ईडी’ने जप्त केला आहे. तो त्या राज्यातील गरीबांना वाटणार, असे नवीन आश्वासन मोदी यांनी काल जाहीर सभेत जनतेला दाखविले आहे,”
15 लाखांच्या झुमल्या प्रमाणेच हे सुद्धा एक गाजर आहे ते निवडणुकीनंतर हवेतविरूनजाणार असा टोला ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींनी लगावला आहे.
“पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपने राजघराण्यातील राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. मोदी यांनी ही घोषणा करताना सांगितले की, “पश्चिम बंगालमधील ईडीने सुमारे तीन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. हा सगळा सामान्य जनतेकडून लुटलेला पैसा आहे. त्यातील बहुतांश रक्कम ही नोकरी मिळविण्यासाठी घेतली गेली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा हा पैसा तिचा तिला मिळायला हवा, अशी आपली भूमिका आहे. भाजप सरकार त्यासाठी काही ना काही मार्ग काढेल.”
लाचखोरी किंवा अन्य मार्गाने सामान्य जनतेकडून लुटलेला पैसा परत जनतेलाच मिळावा, असे म्हणण्यात कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त मोदी यांचे हे आश्वासन सत्यात उतरणार की आजपर्यंतच्या अनेक आश्वासनांप्रमाणे लोकसभा निवडणूक संपल्यावर हवेत विरून जाणार? हा खरा प्रश्न आहे,” असं ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
“आज सलग दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतर काय चित्र आहे? ना महागाई हटली ना बेरोजगारी. ना विकास झाला ना नवीन रोजगारनिर्मिती. किंबहुना आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकास संस्थेचा ताजा अहवाल मोदी सरकारच्या रोजगारनिर्मितीच्या दाव्यांचे वस्त्रहरण करणारा ठरला आहे. देशातील तब्बल 83 टक्के बेरोजगार तरुण आहेत. त्याचप्रमाणे अडीच दशकांपूर्वी बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा टक्का 35.2 इतका होता. तो आता थेट 65.7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मोदी सरकारच्या आश्वासनांची तऱ्हा ही अशी आहे. आणि तरीही मोदी आता पश्चिम बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा गरीबांना परत करण्याच्या बाता करीत आहेत. 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना 15 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले. मोदी यांनी आपले शब्दही गिळले आणि वल्गनादेखील,” असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत