शिंदे गटाच्या दुसऱ्या यादीची उत्सुकता वाढली..

मुंबई : आत्तापर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंड, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील या सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलीय.
काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या रामटेकच्या राजू पारवेंनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी, नाशिकचे खासदार हेमंत गोडेस, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, पालघरे खासदार राजेंद्र गावित यांना वेटींग वर ठेवण्यात आलंय. तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवारही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुस-या यादीची उत्कंठा अधिकच वाढलीय.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत