नागपुरात ढगफुटी! जिल्हा व महानगरातील शाळांना आज सुट्टी जाहीर.

नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागात पाणी शिरले असून नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनीमधील अनेक घरात पाणी शिरले आहे. हवामान खात्याने नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. तसेच येथे अजूनही अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत