दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

लोकगायिका नेहासिंह राठौरसध्या प्रचंड चर्चेत !

🌻रणजित मेश्राम लेखक सुप्रसिद्ध विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत

स्पष्ट उच्चारण , तीक्ष्ण शब्दफेक , विषयाचा अभ्यास व बिहारी शैली या जोरावर भोजपुरी व्यंगकार नेहासिंह राठौर ही युवती सध्या प्रसिद्धीच्या उच्चांकावर आहे.

नुकताच तिच्याविरुद्ध उत्तरप्रदेश राजधानी लखनऊ येथे गुन्हा दाखल झाला.

तिचे व्यंग व कटाक्ष , दोन धर्मियांत तेढ निर्माण करतात असा हजरतगंज पोलिसांचा आरोप आहे. तशी ती मूळ बिहारची आहे. पण माध्यमांनी तिला घराघरात पोहचविले. ती सातत्याने देशप्रमुखांना प्रश्न विचारत असते. त्यात तिचे सातत्य आहे.

२८ वर्षाच्या या युवतीने सध्या उत्तरभारतात वैचारिक आग लावली. ती सरळ विचारते , भाजप म्हणजे देश नव्हे. नरेंद्र मोदी देव आहेत काय ? मी प्रश्न का विचारु नये ? मी प्रश्न विचारु नये म्हणून एफ आय आर दाखल झाले.

पहलगाम हत्याकांडावर प्रश्न विचारला तर इतका गहजब झाला. मी देशद्रोही सांगण्याची मोहिम सुरू झाली. हिला तुरुंगात टाका अशी मागणी होत आहे. अर्थात मी देशद्रोही ? प्रश्न विचारण्याने देशद्रोह ! माझा भाऊ आज सैन्यात आहे. नात्यागोत्यातील कितीतरी सैन्यात होते , आहेत. प्रत्यक्ष लढतांना बरेच शहीद झाले. विकलेल्या माध्यमांनी व ट्रोलर्सनी मला देशप्रेम शिकवू नये.

तशी ती चर्र धारदार बोलते. संथ , शांत चिरत नेते. आक्रमक न होता देहबोलीची ही शैली क्वचित दिसावी. ती कानपूर विद्यापीठाची बी एससी आहे. वडील आर्किटेक्ट व आई गायिका. २०२२ ला चळवळीतील तरुण हिमांशू सिंह याचेशी लग्न झाले. हिमांशू आयएएस कोचिंग सेंटरला शिक्षक आहे.

     याआधी नेहाचे 'का बा' हे व्यंग खूप गाजले. आधी बिहार मे का बा ? नंतर यू पी मे का बा ? शेवटी एम पी मे का बा ? असे ते चालले. तिचे कवन कापदार असले तरी आवाजातील गोडवा वेगळाच भाव देतो. तिला अभिनयाचे अंग असावे. ती पदर घेऊन असो की 'बाबकट' असो , पहावीशी .. ऐकावीशी आहेच ! 

     तिचे विचारणे सामान्यांच्या सहज गळी उतरते. ती म्हणते , गरिबीवर विचारणे तुम्हाला झेपत नाही , बेरोजगारी तुमच्या हिशेबात नाही , भ्रष्टाचार म्हटले की नाक मुरडता .. मग मी विचारु कशावर ? पहलगाम वर विचारले तर देशद्रोही ठरवता ? माझी चित्रफित पाकिस्तानी लोकांनी मोबाईलवर डकवली तर मी काय करणार ? म्हणून देशद्रोही ? हद झाली ही ! 

     अशी ही नेहासिंह राठौर , येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

० रणजित मेश्राम

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!