JNU मध्ये ABVP ला धूळ चारत पहिला आंबेडकरवादी अध्यक्ष बहुमताने विजयी; लोकसभा २०२४ चा ट्रेलर.
दिल्ली: जिथे शिक्षण आहे तिथे जातीवाद, विषमतावाद द्वेष हे राहू शकत नाही. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी दिल्ली इथे झालेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुका. जवळ जवळ ७५% इतके भरघोस मतदान झाले आणि सर्वच्या सर्व जागांवर लोकशाही चा पुरस्कार करणारे, शिक्षणाला महत्त्व देणारे विद्यार्थी निवडून आले.
RSS – BJP पुरस्कृत उमेदवारांना एकही जागा मिळवता आली नाही. खूप मोठ्या फरकाने ABVP ला हार सहन करावी लागली.
जर देशातील लोकसभा निवडणुकीत ही अशाच पद्धतीने जास्तीत जास्त संख्येने मतदान झाले, बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या आणि जनतेने भविष्याच्या दृष्टीने खरे खुरे महत्त्वाचे मुद्दे विचारात घेऊन मतदान केले तर नक्की संविधान विरोधी, जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखता येऊ शकेल, त्या दृष्टीने JNU निकाल हा लोकसभा २०२४ च्या निकालाचा ट्रेलर म्हणून पाहता येईल.
JNU निकाल – 2024
प्रेसिंडेंट
धनंजय (Left) – 2598 (जीत)
उमेश चंद्र अजमीरा (ABVP): 1676
उपाध्यक्ष
अवजीत घोष (Left) : 1676 (जीत)
दीपिका शर्मा (ABVP) : 1482
जनरल सेक्रेटरी
प्रियांशी आर्या (BAPSA Left) : 2887 (जीत)
अर्जुन आनंद (ABVP) : 1961
जॉइंट सेक्रेटरी
मोहम्मद साजिद (Left) : 2574 (जीत)
गोविंद दंगी (ABVP): 2066
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत