मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्ग मध्ये हिंदू व मुस्लिम बांधवाचे एकतेचे दर्शन

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी केले इप्तार पार्टीचे आयोजन

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे या शहरांमध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात नळदुर्ग शहरांच्या तुलनेत किमान ३० हजाराच्या आसपास लोकसंख्या असून या शहरांमध्ये सर्व धर्माचे लोक राहतात परंतु बारकाईने या गोष्टीकडे लक्ष दिले तर प्रत्येक धर्माचे लोक एक मेकाच्या जयंती उत्साहामध्ये समाविष्ट होतात त्याच पद्धतीने आज रोजी नळदुर्ग शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या प्रयत्नातून नळदुर्ग शहरात हिंदू व मुस्लिम बांधवांचे एकतेचे दर्शन दिसून आले त्यामुळे नळदुर्ग शहरांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला गळा भेट देत एकमेकांना शुभेच्छा देतात आणि हिंदु व मुस्लीम बांधवाच्या सणामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतोत
दरवर्षा प्रमाणे यावर्षीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वतीने २६ मार्च रोजी मुस्लिम बांधवांसाठी नळदुर्ग येथील नानीमाॅ दर्गाह समोरील प्रांगणात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टीची सुरुवात खासदार ओमराजे निंबाळकर व अशोक जगदाळे यांच्या हस्ते हजरता नानीमाॅ सरकार रहे अलै यांच्या मजारीवर चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर रिजवान काजी यांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर व अशोक जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, शहेबाज काजी, नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरीफ शेख, इमाम शेख, माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, बसवराज धरणे, कमलाकर चव्हाण, जेष्ठ पत्रकार विलास येडगे पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे अमर भाळे तन्वीर अली खतीब, अख्तर काजी अमृत पुदाले, सरदार सिंग ठाकूर, महेबूब शेख,रुकनोद्दीन शेख अजमत जाहगीरदार, सलमान काझी,ताजोद्दीन सय्यद, मन्सूर शेख, मिन्हाजोद्दीन इनामदार यांच्यासह राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. इफ्तार पार्टीचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कुदरत शेख, हाजी खतीब, मोहसीन जागीरदार, इरफान जागीरदार, दीपक काशीद, नवल जाधव,प्रवीण चव्हाण अमित शेंडगे यांच्यासह इत्यादी जणांनी परिश्रम घेतले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!