शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी…

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडचा पक्ष हाच मूळ शिवसेना राजकीय पक्ष आहे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र ठाकरे यांच्या वकीलांनी सोमवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यांना १ तारखेपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं असून याप्रकरणी ८ फेब्रुवारीला पुढची सुनावणी होईल. एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले सर्व १४ आमदार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधीमंडळ सचिवालयाला नोटीस बजावली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत