तेलवाडी पैठण दलित मुलीवरील बलात्कार प्रकरण :

निशब्द आहे, तिला मी बघितलं अन् जाग्यावर बसलो…आज पीडित कुटुंबाला भेट दिली. अतिशय निरागस 13वर्षीय मुलीवर निरागस मुलीवर पाशवी अत्याचार केला आहे….दीपक केदारे.-ऑल इंडिया पँथर सेना
अनुसूचित जातीची, गरीब, तिला वडील नाहीत, आई मजुरी करते हे आमचं काय करणार म्हणत माजलेल्या नराधमांनी घरापासून अडीज किलोमिटर लांब कॅनल च्या बाजूला, उसाच्या शेतीला चीटकुन असलेल्या झोपडीत तिच्यावर पाशवी दोन नराधमांनी बलात्कार केला. भाऊ धावून आला नाही तर तिची हत्या करून बाजूच्या कॅनल मध्ये फेकले असते तर तिच्यासोबत काय झालं हे सुध्दा कळले नसते.
महाभयंकर अन्याय नंतर आमच्यावर दुसरा अत्याचार होतो तो पोलीस स्टेशनमध्ये लवकर एफआयआर झाली नाही, पंचनामा तात्काळ होत नाही, पीडितेला तात्काळ हॉस्पिटल मध्ये नेलं जात नाही उलट आरोपीचा गोरख नामक चुलता पोलीस स्टेशनला येतो माझ्याकडे पोत्याने पैसे आहेत, माझ्यामागे आमदार पालकमंत्री आहे म्हणत दादागिरी करतो ती ही पोलीस स्टेशन मध्ये जिथे सिसीटीवि कॅमेरे लावले आहेत. न्याय मागणाऱ्या ना म्हणतात बाहेर जा किती दुर्दैव आहे.
ऑल इंडिया पँथर सेना या नराधमाना जन्मठेपेची मागणी करत आहे. पीडितेला चांगल्या दवाखान्यात नेऊन तिचा इलाज करावा, फास्ट ट्रॅक कॉर्टच्या माध्यमातून अडिज महिन्यात शिक्षा ठोकावी, पीडित मुलीच्या शिक्षणाची आणि शासकीय नोकरीची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी.
संदीपान भुमरे हा सरकारचा प्रतिनिधी आहे, त्याचं नाव घेऊन आरोपी पिडीतांना धमकावत आहेत, त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. पोलीस अधिकारी, आरोपी आणि भूमरे यांचे कॉल डिटेल चेक केल्यास सत्य बाहेर येईल. मी चारशे किलोमिटर वरुन येतो भुमरे जातियवादी आहे म्हणून 50 किलोमिटर वरुन येऊ शकत नाही यातच त्याची जातीय प्रवृत्ती उघडी झाली आहे.
राज्यभर आम्ही या अमानवीय कृत्याचा निषेध करणार, मोर्चे काढणार सर्व प्रलंबित अट्रोसीटी ॲक्ट च्या बलात्कार हत्याकांड प्रकरणातील आरोपींना शिक्षा ठोकली पाहिजे अशी मागणी सुद्धा करत आहोत.
JusticeForTelwadi
DalitLivesMatter
AllindiaPantherSena
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत