संविधान जनजागृती प्रचार रॅलीचे परभणी स्वागत-

लॉर्ड बुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट जालना,आयोजित संविधान जागृती प्रचार मोहीम, ई.व्ही.एम. व्ही.व्ही.पॅट हटाव, बॅलेट पेपर या जनजागृतीसाठी संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रभर 15 फेब्रुवारी 2024 रोजी.पासून क्रांतीभूमी महाड येथून या प्रचार रॅलीची सुरुवात करून 20 मार्च 2024 रोजी धम्मक्रांती नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीचा मुख्य उद्देश ईव्हीएम व्हीव्हीपॅट हटवून निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर वरती जुन्या पद्धतीने निवडणूक घ्याव्यात. या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेषता मूलभूत हक्काची जाणीव संविधानातून करण्यासाठी जनमानसात जनजागृती निर्माण करणे ,राजकारणाच्या जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मूलभूत हक्कांची जागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेषतां लोकशाहीतील मताचा अधिकार हा सर्वोच्च स्थानी असतो.आणि मागील वीस वर्षापासून हा मताचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे.यासाठी देशातील मुख्य निवडणूक केंद्रीय आयुक्त जबाबदार आहे. त्या विरोधात या रॅलीचे आयोजन सर्वसामान्य जनमानसात करण्यात आलेले आहे.तेव्हा या रॅलीच्या सर्वात जास्त लोकांनी फायदा घ्यावा व रॅलीचा भाग व्हावा म्हणून रॅलीचे मुख्य आयोजक अनंत भवरे, संविधान विश्लेषक,औरंगाबाद, त्यांचे सहकारी चंद्रमणी गाडेकर, जालना, सदाशिव हिवाळे,बुलढाणा या यांनी केले आहे. आज सकाळी 11:वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर परभणी या ठिकाणी अभिवादन करून पुढे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. व सावित्रीबाईंच्या स्मृतीला अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली. या भारतीय संविधान जनजागरण प्रचंड रॅलीचे स्वागत करण्यासाठी संविधान साक्षरता अभियानाचे प्रमुख डॉ. प्रवीण कनकुटे, मुंजाजी कांबळे, राहुल वाकडे,वेदांत कांबळे,प्रमोद राऊत, चंद्रकांत शेळके यांनी परिश्रम घेतले. या संविधान रॅलीचे स्वागत करण्यासाठी सूत्रसंचालन डॉ.चंद्रकांत गांगुर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.अरविंद लोणकर यांनी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत