
जा सखे जा घरी
वाट पाहती सारे
रागे भरले मनी जरी
पाहा प्रकाशातले तारे
नको रुसवा नको फुगवा
जाऊन तरी जाणार कोठे
जे आहे ते आपलेचं आहे
असे कर स्वःता मन मोठे
वाहवा! होईल तुझी
संयम ठेवुन राहा खरी
जातील दिवस हे निघुन
पाहशील आनंदाची सरी .
जबाबदारी घेवुन सारी
दाही दिशा मोकळ्या कर
नको डगमगु तु तरी
यशाचे शिखर हाती धर .
चाल चाल पुढे नारी
जयघोष तुझा होवु दे
घर नोकरी सांभाळुन सारी
यश तुला सदैव लाभु दे
वंदना सुतार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत