८ मार्च जागतिक महिला दिवस का व कसा साजरा करावा?

जगातील पहिले महिला कामगारांचा प्राणांतिक आंदोलन १९०८ साली जागतिक महिला दिवस चे बीज रोवले गेले.
१९०८ ला १५००० महिलांनी न्युयॉर्क च्या रस्त्यावर मोर्चा काढला ते यासाठी….
१)कामाचे तास कमी करावे
२)कामाच्या तुलनेत पगार मिळावा आणि
३)मताचा अधिकार मिळावा.
महिलांच्या या आंदोलनाला घेऊन
१९०९ ला सोशालीस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने प्रथमता राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित करून साजरा करण्यात आला.
या राष्ट्रीय महिला दिवसाला जागतिक पातळीवर मान्यता मिळावी व ते साजरी करण्यात यावी या करीता अथक परिश्रम घेणारी ती क्लारा झेटकीन
क्लारा हि साम्यवादी विचारसरणीची होती.महिला न्याय, हक्क, अधिकाराच्या त्या पुरस्कर्ते होत्या.
क्लारा ने १९१० ला कोपनहेगन मध्ये जागतिक महिला दिवस संबंधिचा प्रस्ताव महिला कामगार परिषदेत मांडला.
या परिषदेत १७ देशांतील १०० महिला उपस्थित होत्या.सर्वांनी एक मताने प्रस्ताव मान्य केले.
त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस १९११साली आॉस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड मध्ये साजरा करण्यात आला.
क्लारा झेटकीन नी जेव्हा ही कल्पना मांडली तेव्हा कोणतीही तारीख किंवा दिवस निश्चित केला नव्हता.
ती ठरली १९१७ ला जेव्हा पहिले विश्वयुध्द सुरू होते त्यादरम्यान रशियन महिलांनी “भाकरी आणि शांतता” अशी मागणी घेऊन संप पुकारला.चार दिवस प्राणांतिक संप सुरू होता नंतर राजकीय उथलपुथल झाली आणि शेवटी रशियन झारना पद सोडावे लागले.नंतर स्थापण झालेल्या हंगामी सरकारने महिलांना मताचा अधिकार देनारा कायदा केला.
तेव्हा रशियामध्ये ज्युलियन केलेंडर वापरले जात होते.ज्युलियन केलेंडर प्रमाणे ज्या दिवशी महिलांनी संप पुकारला तो दिवस २३ फेब्रुवारी चा होता .ग्रॅगोरीअन केलेंडर (जे आज आपण वापरतो) प्रमाणे या तारीख ८ मार्च होते.
त्यामुळे १९०८ व १०१७ च्या ऐतिहासिक महिलांच्या प्राणांतिक आंदोलन,संप यांची आठवण रहावी म्हणून ८ मार्च ला जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
आज या दिवसाची परिभाषा बदलली आहे.
विवीध क्षेत्रात प्रगती पथावर गेलेल्या किंवा प्रयत्न करणार्या महिलांना शुभेच्छा देणे.
कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना भेट वस्तू देने.
वेगवेगळे व्यावसायिक प्रतीमा दिसणारे वस्र परीधान करणे.
इथपर्यंत च मर्यादित आहे.
८ मार्च या दिवसी महिलांनी केलेल्या प्राणांतिक आंदोलन संप ची आठवण करतांना कोणी दिसत नाही याचाच मला खंत वाटते.(अपवाद वगळता)
२०१६ ला जागतिक महिला दिनाचे घोषवाक्य होते
“भुतकाळ साजरा करतांना भविष्याची धोरण ठरवण”.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत