काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात तुळजापूरच्या भीम सैनिकांचा होता सहभाग..

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तुळजापूरचे वतनी कदम मंडळी यांचा संबंध खूप जवळचा आणि सलोख्याचा.
न.प. तुळजापूरचे आद्य नगराध्यक्ष देविदास मारुतीराव कदम, बाबासाहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या 1942 सालच्या कसबे तडवळे येथील महार मांग वतनदार परिषदेचे स्वागतअध्यक्ष देविचंद मारुतीराव कदम, मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीच्या कार्यात योगदान देणारे सुमंतराव कदम, बाबासाहेबानी स्थापन केलेल्या तत्कालीन समता सैनिक दलाचे सक्रिय पदाधिकारी व बाबासाहेबांच्या सोलापूर, बार्शी, कसबे तडवळे येथील सभांना संरक्षण देणारे शहाजी दादा कदम( द्वितीय नगराध्यक्ष – न. प. तुळजापूर), निवृत्त सैनिक शत्रुघ्न कदम, देवप्पा कदम, शरणाथ कदम इत्यादी अनेक मंडळी कार्यरत होती. इतरही अनेक कदम मंडळी सक्रिय होती परंतु काळाच्या ओघात दुर्लक्षित झाली किंवा त्यांची माहिती उपलब्ध नाही, परंतु त्या सर्वाना सविनय पंचांग प्रणाम.
1930 सालच्या काळाराम मंदिर सत्याग्रह या ऐतिहासिक मानव मुक्तीच्या लढ्यात तुळजापूरचे कदम मंडळींनी मोलाचे योगदान दिले. तुळजापूर नगरीचे आद्य नगराध्यक्ष देविदास मारुतीराव कदम व तुळजापूरचे माणिक रानोबा कदम (डिगा बाबा) यांचा काळाराम मंदिर नाशिक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, भाऊराव कृष्णाजी गायकवाड़, केशव वर्धेकर, शंकरराव गायकवाड यांच्या समवेतचा एक क्षण..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत