संत शिरोमणी गुरू रविदास जी महाराज लेख शृंखला – 6

का मथुरा का द्वारका,का काशी हरिद्वार!
रविदास खोजा दिल आपना ,तऊ मिलीया दिलदार!!
अनादी काळापासून मानव परमेश्वराचा शोध घेत आहे.तो शोध भक्ती ,तप,यज्ञ याग,नवस, बळी, तिर्थाटने,परिक्रमा ई.मार्गाने आज ही चालू आहे.ग्रू रविदासजी महाराज म्हणतात …मी मथुरेला,काशीला, द्वारकेला जाऊन, देवाला शोधले पण…तो तिथे सापडला नाही.तिथे पुजारी सापडला. देवाच्या नावाने आपले पोट भरणारे पाप,पुण्याची भिती घालून,कर्मकांड करणारे अंधश्रद्धा पसरवणारे सापडले .. मला त्या विधीत तिथे देव सापडला नाही बंधुनो. मी परमेश्वराच्या शोधात देशभर धामातून यात्रा,जत्रेतून खूप भटकलो.पण तो तेथील स्नानात, पुजा यागात देव दिसला नाही..! देव कुठे मिळेल याचा विचार करता करता आणि शोध करता करता मी माझ्या मनाला धुंडाळले आणि तो दिलदार मला मनात लगेच सापडला..!
तुरूक मसीति अल्लह ढूंढइ,देहरे हिंदू राम गुसांइ!
रविदास ढूंडिया राम रहिम कूं,जंह मसीत देहरा नाही.!!
मुस्लिम बांधव रहिम मशिदीमध्ये तर,हिंदू राम देव्हारयात ,मंदीरात शोधतात.पण मी ( रविदासाने) राम व रहिम दोघांना एकत्र अश्या जागी शोधले की ती जागा मशिद ही नव्हती व मंदीर ही नव्हते. ती जागा मन होते. राम रहिम एकच आणि सर्वत्र आहे.सर्वत्रा मध्ये मंदिर मशिद ही येते पण.. तो मंदिरात, मुर्तित निवास करतो असे सांगून जे कर्मकांड विधी करवून घेतात ,त्या विधीने देव प्रसन्न होत नाही. तो व्यापक आहे. तो निरगुण निराकार आहे.कसलाही विधी न करता मनात त्याचे ध्यान करा तो मनात येतो..!
देता रहे हज्जार बरस, मुल्ला चाहे अजान!
रविदास खुदा नंह मिल सकइ जौ लौ मन शैतान!!
ज्या मुल्लाच्या मनांत सैतानी विकार आहेत अश्यांनी हजार वर्षे बांग देत राहिला तरी तरी त्यांना खुदाचे दर्शन मशिदीत होणार नाही. खुदा पाक,निर्मळ प्रेमळ मनातच सापडेल ..!
जिसके इश्क आसरा नही क्या नमाज,क्या पुजा?
पाक ,पवित्र मनात रहणारा दिलदारा राम व रहिम एकच आहे. ज्याच्या मनात प्रेम नसेल,त्याला आसरा नसेल तर तो सापडनारच नाही. ज्या दिवशी, ज्या ठिकाणी, मनात राम रहिमचे प्रेम आणि आसरा येईल त्या दिवशी ,त्या ठिकाणी राम रहिमचे दर्शन होईल .बंधुनो,इश्वर एक आहे .नावं अनेक आहेत तो दिलदारा निर्गुण ,सर्व व्यापक निराकार आहे.त्यावर प्रेम करा ….!!
जय रविदास.
लेखक,ॲड.आनंद गवळी.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ.राष्ट्रीय उपाध्यक्ष
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत