आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

सोमवार दिनांक 19.2.2024 रोजी भारतीय बौद्ध महासभेचे तुळजापूर शहर अध्यक्ष अप्सराताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्हा संस्कार सचिव कुमार ढेपे, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष विश्वास पांडागळे, जिल्हा पर्यटन सचिव दत्ता माने, संघटक सुकेशन ढेपे, तालुका महिला विभाग प्रमुख लक्ष्मिताई कदम, तालुका समता सैनिक शोभाताई चौधरी, वंचित बहुजन आघाडी चे आयु. मिलिंद दादा रोकडे, TISS येथील आयु शकुंतलाताई जारे, हिवाळे ताई, शीलाताई शिंदे, संजय चौधरी, संगीताताई कदम यांच्यासह हडको तुळजापूर येथील महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.
तथागत भगवान बुध्द, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदना घेण्यात आली.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श राज्य कारभार, महिलांचा सन्मान, अठरा पगड जातींना सोबत घेऊन
निर्माण केलेले स्वराज्य या प्रेरणादायी बाबी तरुण पिढीला समजावून सांगण्यात आल्या.
आयु. कुमार ढेपे यांनी उपोसत व्रताबद्दल सविस्तर माहिती सांगितली. उपवासाचे महत्त्व, बौद्ध धम्मातील दान पारमिता या विषयांवर अतिशय सखोल प्रवचन दिले. महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. देविदास कदम यांनी तर आभार प्रदर्शन आयु. वैष्णवीताई शिंदे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत