सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही ?

प्रदीप मयेकरकृत अनुवाद-
——————
मोदी गेली सात वर्षे, सातत्यानं, सभां मधून, सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही असा बकवास करत या खंडप्राय देशाचा सतत अपमान करत आलेत…. मी मोदींची ती चूक सुधारत, मोदिंच्या वतीनं या देशाची माफी मागत, मोदींना आज काही गोष्टी सांगाव्यात म्हणतो….
- विनोद दुआ
मोदी तुम्ही जन्माला आलात १७ सप्टेबर १९५० रोजी, या दरम्यान देश स्वतंत्र होऊन या देशात एका सक्षम आणि अद्वितीय संविधानाची निर्मिती झाली होती आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे अद्वितीय संविधान या देशात रुजू झालं होतं, अर्थातच,तुमचा तेव्हा जन्म ही झाला नव्हता…
पाळण्यात असाल बहुधा मोदीजी, कदाचित सहा महिन्यांचे,तेव्हा या देशाकडून, पहिल्या एशियन गेम्सचं अत्यंत देखणं आयोजन करुन झालं होतं साल होतं १९५१
तुम्ही असाल तेव्हा चार वर्षांचे… म्हणजे १९५४ ला, तर मोदीजी,या वर्षी या देशात भाभा अणुशक्ती केंद्र नावाचं एक सेंटर स्थापन झाल होतं.
११ वर्षांचे झालात, पाचवीत वगैरे असाल त्यावेळी या देशात, डझनभर आय आय टी,आय आय एम, उघडली, विद्यापीठं उघडली आणि याच संस्थांमधून जे टाॅप क्लास विद्यार्थी घडले , त्यातल्या काहींनी परदेशाचा रस्ता धरला (परदेशी गेल्यावर तुम्हाला जो “मोदी मोदी” जल्लोष ऐकायला येतो ना तो याच नतदृष्टांचा.)
मोदीजी जवळपास याच वर्षी, १९६१ साली या देशानं, पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून,गोवा, या खंडप्राय देशात विलीन केला, तुम्ही तेव्हा केवळ अकरा वर्षांचे होता.
मोदीजी, तुम्ही जेव्हा १३ वर्षांचे होता, तेव्हा या देशातलं , भाकरा नानगल नावाचं महाप्रचंड धरण बांधून झालं होतं…१९६२-६३
मोदीजी, चौदा वर्षांचे असताना, या देशात विमानांचं असेंबलिंग आणि हेलीकाॅप्टर्सची निर्मिती सुरू झाली..१९६४
पंधरा वर्षांचे होतात, तेव्हा या देशाच्या फौजानी लाहोर पर्यंत धडक दिली आणि आपले उपोषण सम्राट अन्ना हजारे तेव्हा भारतीय सैन्यात ड्राइव्हवर होते….
मोदीजी तुम्ही १९वर्षांचे असाल तेव्हा…. तेव्हा या देशात १९६९ साली, तारापूर न्युक्लिअर पाॅवर प्लांट सुरू झाला होता, इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन याच वर्षी या देशात अस्तित्वात आलं होतं…
मोदीजी, तुम्ही २१ चे झालात, घरातुन पळुन हिमालयात भिक मागत होतात तेंव्हा या देशाचे कायदेशीर मतदार झालात, तेव्हा इंदिरा गांधी नावाच्या,या देशाच्या एका बुलंद पंतप्रधानानी, पाकिस्तान नावाच्या देशाचे दोन तुकडे करून,बांगला देश नावाचा एक नवा देश या भूतलावर जन्माला घातला..
मोदीजी तुम्ही २४ वर्षांचे झालात आणि या देशानं पहिलं परमाणू परिक्षण केलं बरं का…ते साल होतं १९७४
मोदीजी, तुम्ही आता ३७ वर्षांचे झालात, म्हणजे साधारण १९८७ ला वगैरे..तर त्या दरम्यान,या देशात राजीव गांधी नावाच्या पंतप्रधानानी , सुपर कॉम्प्युटर आणि इनफाॅरमेशन टेक्नॉलॉजी नावाची नभूतो अशी क्रांती आणली आणि या देशानं प्रगतिच्या क्षितीजावर एक बुलंद भरारी घेतली……
राजीवजींचा खून झाला,त्यानंतर तूमच्या पक्षाच्या पाठिंब्यावर तूमच्या सारख्यां चूकिच्या व्यक्तीच्या ताब्यात देशाचे नेतृत्व गेल्यावर देश प्रचंड आर्थिक संकटात सापडला असतांनाच नरसिंह राव नावाचे गंभीर आणि विद्वान गृहस्थ या देशाचे पंतप्रधान झाले… देश एका महाभयंकर आर्थिक संकटात सापडला होता,या देशाचं सोनं जागतिक बँकेकडे गहाण ठेवावं लागलं होतं
पण तुम्हाला सांगतो मोदीजी, डॉ.मनमोहनसिंग नावाचे एक जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री , नरसिंह रावांच्या मंत्री मंडळात अर्थमंत्री होते, या अर्थमंत्र्यांनं आपल्या पंतप्रधानांच्या सहाय्यानं या देशात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करून देशाला त्या संकटातून अलगद बाहेर काढलं.
हेच मनमोहनसिंग पुढे या देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते बरं का.याच दरम्यान,मोदीजी चंद्रयान, मंगळयान, जीएसएलव्ही, मेट्रो, मोनोरेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, जहाजे, सबमरिन्स, पृथ्वी, अग्नी, पिनाक, नावाची मिसाईलस्, तेजस,चेतक, धनुष, नावाची हेलिकॉप्टर्स, सुखोई, मिग फायटर विमानांची निर्मिती
बरं असो मोदीजी आता थांबतो,थकलो …
पण शेवटचा एक प्रश्न विचारतो….
मोदीजी देशात झालेली ही अल्प,स्वल्पशी प्रगती खरच तुम्हाला ठाऊक नाही ?
आणि असेल ठाऊक तर मग तोंड उचकटून ,कशाला हो या देशाचा वारंवार अपमान करीत असता?
मित्र हो, पुढे २०१४ च्या मध्यावर खुद्द नरेंद्र दामोदरदास मोदीच या देशाचे पंतप्रधान झाले आणि पुढचं तुम्हाला ठाऊक आहे,मी कशाला सांगू….
७०वर्षात काय केले?
जे केले तेच विकून विकून सुध्दा देश चालवता येईना. फक्त थापा आणि थापा
सर्व भारतीयांना एकच नम्र आव्हान आहे की मागील ७० वर्षांत ग्रामीण भागात ज्याज्या ठिकाणी प्राथमिक शाळा चालू
आहेत त्या बंद होऊ देऊ नका.
खाजगी शाळा झाल्यास ग्रामीण व गरीब
लोक मुलांना शिक्षण देऊ शकणार नाहीत.
शिक्षणाचे व्यापारीकरण होऊ देऊ
नका!
FB विनोद दुआ यांच्या रोखठोक विश्लेषणाचा अनुवाद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत