
वायव्य राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या काही भागात सुद्धा दाट धुकं नोंदवलं गेल्याचे भारतीय हवामान विभागानं सांगितले. वायव्य भारत थंडीनं गारठला असून पंजाब, हरयाणा, चंदीगढ आणि नवी दिल्लीतल्या अनेक भागांत आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळाली. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक गाड्या उशीराने धावत आहेत. नवी दिल्लीत येणाऱ्या २२ गाड्या या धुक्यामुळे विलंबानं धावत असल्याचे उत्तर रेल्वे प्रशासनानं सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत