
या सामन्यात इंग्लंडनं २३० धावांची आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज हैदराबाद इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावात आटोपला. कालच्या ३१६ धावसंख्येवरून आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर जसप्रीत बुमराहनं ४, आर अश्विननं ३, अक्सर पटेलनं १ तर रविंद्र जाडेजा यानं २ गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दुसऱ्या डावात भारताच्या ७ गडी बाद १२४ धावा झाल्या असून, विजयासाठी भारताला १०७ धावांची गरज आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत