
नितीश कुमार विक्रमी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत आणखी ८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपा युतीच्या नव्या सरकारचा शपथविधी आज संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करत विद्यमान राज्य सरकार विसर्जित करण्याची शिफारस केली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत