
दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातून दिल्लीकडे येणाऱ्या २८ गाड्या उशीराने धावत आहेत. उत्तर भारतात धुकं आणि थंडीची लाट कायम असल्याने,दिल्लीतील रेल्वे आणि विमान सेवा प्रभावित झाली आहे. हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या गाड्या वेळेपेक्षा किमान ४ तास उशिरा धावत आहेत.धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (IGIA) विमानांची उड्डाणे उशीरा झाली तर काही विमान सेवा रद्द करण्यात आल्या. आयएमडीने येत्या २६ तारखेपर्यंत पंजाब,हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये दाट धुकं पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार,दिल्लीचं किमान तापमान ६.९अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं,जे सामान्य तापमानापेक्षा एक अंश कमी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत