उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या नवी दिल्ली इथे ‘हमारा संविधान,हमारा सम्मान’या अभियानाचा प्रारंभ…
कायदा आणि न्याय मंत्रालया अंतर्गत एक वर्ष चालणाऱ्या या अभियानाचं उद्दिष्ट, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रती सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणं,आणि देशाला एकत्र बांधून ठेवणारी सामायिक मूल्य साजरी करणं,हे आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त,उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या नवी दिल्ली इथे ‘हमारा संविधान,हमारा सम्मान’,अर्थात ‘आमचं संविधान, आमचा सन्मान’,या अभियानाचा प्रारंभ करतील.‘सर्वांना न्याय-घरोघरी न्याय,नव भारत-नव संकल्प, आणि विधी जागृती अभियान’,या प्रमुख संकल्पनांवर ते आधारित आहे.अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी,कायदे विषयक माहिती,सल्ला आणि मदत यामध्ये एकसमानता प्रदान करण्याच्या उद्देशानं न्याय सेतूचं उदघाटन करण्यात येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत