खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल स्थानी…
योगासनांमधली २ आणि तलवारबाजीतल्या एका सुवर्णपदकामुळं महाराष्ट्राच्या खात्यात ८ सुवर्णपदकांसह एकूण ३० पदक जमा झाली आहेत. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समधल्या ५ सुवर्ण पदकांच्या जोरावर महाराष्ट्राने पदक तालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली. ८ सुवर्णपदकांसह एकूण २१ पदकं मिळवून पदक तालिकेत तामिळनाडू दुसऱ्या आणि ६ सुवर्णपदकांसह एकूण २२ पदकं मिळवून हरियाणा पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. रिदमिक जिम्नॅस्टिक्स हूप स्पर्धेत महाराष्ट्राच्या किमया कार्लेनं प्रथम क्रमांक, आणि संयुक्ता काळेनं द्वितीय क्रमांक, तर जम्मू-काश्मीरच्या मुस्कान राणा हिनं तृतीय क्रमांक पटकावला. रिदमिक जिम्नॅस्टिक बॉल स्पर्धेत संयुक्ता काळेनं प्रथम क्रमांक, मुस्कान राणानं द्वितीय, तर हरियाणाच्या लाइफ अडलाखानं तृतीय क्रमांक पटकावला. याच खेळाच्या क्लब इव्हेंटमध्ये मुस्कान राणा शीर्षस्थानी राहिली. महाराष्ट्राची परिना मदनपोत्रा द्वितीय तर हरियाणाच्या लाइफ अदलाखाने तृतीय स्थान मिळवले. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत आज हरियाणानं १० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक आणि राजस्थाननं रौप्यपदक जिंकलं. तामिळनाडूच्या संघाने कांस्यपदक जिंकले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत