४२ मिनिटे चाललेल्या एकतर्फी लढतीत जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शी यूक्यूईकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्याशी यू क्यूईकडून पराभूत झाल्यामुळे भारतीय खुल्या सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेतून काल बाहेर पडला. मात्र पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अॅरॉन चिया आणि सोह वूई यिक या मलेशियाच्या जोडीला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत