मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे काम ३ शिफ्टमध्ये करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
सर्वेक्षण अतिशय महत्वाचं असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मंगळवारपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरू होईल. ते आज वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्यासाठी गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेक्षणाविषयी कळू द्या असं त्यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या माध्यमातून राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सर्वेक्षणासाठी २४ तास कॉल सेंटर सुरु ठेवायचं आवाहनही त्यांनी केलं. प्रगणकांचं तसंच अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण व्यवस्थितपणे करावं असंही त्यांनी सांगितलं. मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचचं काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा आणि बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात येईल.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आंदोलनकर्ते मनोज जरांगे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले. लाखो मराठाबांधव या पायी दिंडीत सहभागी झाले असून, ही पदयात्रा २६ तारखेला मुंबई इथे पोहचणार आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा मोर्चाचे सदस्य राज्याच्या विविध भागातून मुंबईकडे रवाना झाले.राज्यात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, तरीही सरकार निर्णय घेत नाही, असं ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत