प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या हवाई कसरतींमध्ये भारतीय हवाई दलाची एकूण ५१ विमाने सहभागी…

यामध्ये २९ लढाऊ विमाने, आठ वाहतुकीची विमाने, १३ हेलिकॉप्टर आणि एका हेरिटेज विमानाचा समावेश आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या हवाई कसरतींमध्ये भारतीय हवाई दलाची एकूण ५१ विमानं सहभागी होणार आहेत. राफेल, सुखोई-३०, जग्वार, सी-१३० आणि तेजस ही विमाने वेगवेगळ्या प्रकारच्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होतील, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये यंदा महिला अग्निवीरवायूच्या तिरंगी सेवेची तुकडी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये भारतीय हवाई दलाच्या पथकाचं नेतृत्व महिला अधिकारी स्क्वाड्रन लीडर रश्मी ठाकूर, सुमिता यादव, प्रतिती अहलुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनंट कीर्ती रोहिल करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत