एमपीएससीकडून राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट जाहीर

मुंबई ता.१८:
एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट जाहीर झाली असून त्यामध्ये विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर हा दुसरा आला आहे. मुलींमध्ये पूजा वंजारी हिने बाजी मारली असून प्राजक्ता पाटील ही दुसरी आली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवेच्या 600 पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
राज्यसेवेच्या 600 पदांसाठी 2022 साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम 1800 उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. 22 जानेवारी ते 29 जानेवारी या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यानंतर या परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एमपीएससीने म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत