महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना नम्र आवाहन—-गावात, वॉर्डात EVM मशीन घेऊन आलेल्या निवडणुक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हे प्रश्र विचारा!!!…..झालेला संवाद सोशल मिडियावर व्हायरल करा!!!

आपलेच
भारत मुक्ती मोर्चा कार्यनिष्पादन समिती महाराष्ट्र राज्य

ईव्हीएम मशीनमुळे सामान्य नागरिकाच्या मताची किंमत शुन्य झाली आहे, ईव्हीम म्हणजे आधुनिक मनुस्मृती!! ईव्हीएम विषयी अशी समाजमनाची भावना निर्माण झाली आहे.या ज्वलंत भावनेचे लोक विरोध करत असल्याचे
प्रत्यंतर संपुर्ण भारतात पहावयास मिळत आहे.जनक्षोभ वाढत आहे.

या जनक्षोभाची कल्पना शासन,प्रशासन व निवडणुक आयोगाला आलेली असल्यामुळे ईव्हीएम मशीन कशी चांगली आहे,हे जनतेला पटविण्यासाठी कधी नव्हे अशी प्रशासनातील कर्मचा-यांना शासन व निवडणुक आयोग गावागावात,गल्लीबोळात पाठवित आहे.

EVM नावाच्या आधुनिक मनुस्मृतीला रोखण्यासाठी गावातील,वाड्यावस्त्यां मधील सुजाण, संविधानप्रेमी नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना हे प्रश्र विचारावेत ही विनंती

१)काही महिन्यांपुर्वी चांद्रयान मोहीम झाली.त्याचे नियंत्रण जर का पृथ्वीवरुन होत असेल तर ईव्हीएमचे नियंत्रण होणार नाही याचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?
२)टीव्हीचे नियंत्रण तुम्ही सुद्धा रिमोटने करता मग ईव्हीएमचे नियंत्रण होणार नाही याचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?
३)आमचे शेतकरी बांधव देखील घरुन शेतातील मोटरपंप चालु व बंद करु शकतात मग तुमचे ईव्हीएम सुध्दा रिमोटने नियंत्रित होत नसेल कशावरुन?
४)२००४ व २००९ ला ईव्हीएमचा वापर जेव्हा झाला तेव्हा सुध्दा इलेक्शन कमीशन ईव्हीएम योग्य आहे असे सांगत होते.परंतु ८ ऑक्टोबर २०१३ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाचा हा दावा फेटाळुन लावला,यावर आपले म्हणणे काय?
५)आम्ही निवडणुक आयोगाचे मत मानायचे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय,यावर आपले मत काय?
६)आमचा केवळ ईव्हीएमवरच नाही तर निवडणुक आयोगावर सुध्दा विश्वास नाही कारण निवडणुक आयोग VVPAT च्या चिठ्ठ्या १००% मोजायला तयार नाही.VVPATच्या चिठ्ठ्या मोजण्यात वेळ जातो असं निवडणुक आयोगाचे म्हणणे आहे,परंतु जर नोटा मोजायला मशीन आसते तशी चिठ्ठ्या मोजायला मशीन असेल तर ही प्रक्रिया सुध्दा लवकर होऊ शकते.
परंतु निवडणुक आयोगाला चिठ्ठ्या मोजायच्या नाहीत ,म्हणजेच प्रक्रिया पारदर्शी करायची नाही असे म्हणता येते… याबाबत आपले मत काय?
७) जगातील जपान, जर्मनी, अमेरिका यासारखे प्रगतदेश ईव्हीएम वापरत नाहीत तरी भारतीय निवडणुक आयोग ईव्हीएमचा अट्टाहास कशासाठी करतो आहे.
८)तुम्ही EVM बद्दल माहिती देत आहात परंतु आम्ही यातील तज्ञ नाहीत तेव्हा तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निवडणुक विभागाकडुन या EVM बद्दल पारदर्शी असल्याचे प्रमाणपत्र का घेत नाहीत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!