
श्रीलंकेतल्या पर्यटन विकासात २०२३ या वर्षात भारतीयांचा सहभाग प्रथम क्रमांकाचा
भारतीय पर्यटकांची संख्या ही ३ लाखापेक्षा अधिक होती.श्रीलंकेतल्या पर्यटन व्यवसायाच्या विकासात २०२३ या वर्षात भारतीयांचा सहभाग प्रथम क्रमांकाचा राहिला. या वर्षी १४ लाख ८७ हजार पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली. श्रीलंकेतल्या पर्यटकांमध्ये हे प्रमाण वीस टक्के होते.त्याखालोखाल जवळजवळ दोन लाख रशियन प्रवाशांनी श्रीलंकेला भेट दिली.श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाला मोठे महत्व असून देशाच्या उत्पादनात गेल्यावर्षी त्याचा वाटा २ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.भारत आणि श्रीलंकेमध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या दळणवळण सोयी त्याचबरोबर गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेला चेन्नई जाफना हवाई सेवेमुळे ही वाढ झाली आहे. कोलंबो ते मुंबई दररोज उपलब्ध असणारी विमान सेवा त्याचप्रमाणे नादापट्टीनम ते कानकेसंथरुई दरम्यानच्या फेरी बोट सेवेमुळेही अधिकाधिक भारतीय पर्यटक श्रीलंकेला गेले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत