महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिकसंपादकीय

नळदुर्ग शहराच्या विकासात सकारात्मक भुमिका ही पत्रकारच बजावतात :- चव्हाण

यूनिटी मल्टीकॉन्स कडुन नळदुर्ग येथील पत्रकारांचा आदर सन्मान

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग सारख्या ऐतिहासिक शहरांमध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जे ही नळदुर्ग शहरातील मोठे मोठे कामे होतात आणि या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पत्रकाराची भूमिका ही महत्वाची ठरते पत्रकारच प्रत्येक भुमिका मध्ये बदलाव अनु शकतात कारण पत्रकार लोकशाही प्रधान देशांमध्ये पत्रकाराची भूमिका ही महत्त्वाची समजले जाते पत्रकार हा गावचा दुवा असतो .
गावाच्या विकास आराखड्यामध्ये पत्रकारांचे खूप मोठे योगदान आहे असे प्रतिपादन धाराशिव जिल्ह्य शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक कमलाकर काका चव्हाण यांनी व्यक्त केले .
नळदुर्ग शहरात नुकताच पत्रकार दिनाचे औचित्य साधून युनिटी मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य प्रवर्तक तथा कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांच्या संकल्पनेतून नळदुर्ग येथील पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळस ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शफीभाई शेख हे होते . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव शकील मैलवी यानी केले
यावेळी माजी नगराध्यक्ष शहबाज काझी , माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी माजी नगराध्यक्ष नितीन कासार , माजी नगरसेवक बसवराज धरणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर आदीच्या उपस्थितीत नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार विलास येडगे, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , सचिव तानाजी जाधव , पत्रकार दादासाहेब बनसोडे , पत्रकार प्रा डॉ. पांडुरंग पोळ , पत्रकार उत्तम बनजगोळे , पत्रकार आयूब शेख ,पत्रकार मित्र .दत्तात्रय [ अमर ] भाळे ,पत्रकार शिवाजी नाईक, पत्रकार भगवंत सुरवसे , पत्रकार प्रा डॉ दीपक जगदाळे, पत्रकार लतीफ शेख , पत्रकार मुजम्मीर शेख , पत्रकार शोएब काझी , पत्रकार संतोष पुदाले पत्रकार सुनील गव्हाणे , पत्रकार सुनील बनसोडे, पत्रकार नेताजी महाबोले , पत्रकार अजित चव्हाण अंदिचा सत्कार करण्यात आला . यावेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक हित जबाबदारी जपण्याची भूमिका ही पत्रकारावरती असते, कारण वृत्तपत्राचा प्रभाव हे आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर अपरिहार्य पणे पडत असतो पत्रकारिता हे वाचकाचे मत बनविण्याचे आणि गावाचे विकास आराखड्यामध्ये महत्त्वाची भूमिका मांडण्याचे खूप मोठे साधन आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते शफीभाई शेख मांडले
दर्पण दिन या पत्रकार दिनाचे औचित्य साधून एवढी मल्टी कोण कंपनीचे मुख्य प्रवर्तक तथा कार्यकारी संचालक कफिल मौलवी संचालक जय धवल करकमकर संचालक वैशालीताई जैन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनिटी मल्टीकॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अंहकारी यांनी केले
तर कार्यक्रमास युनिटी मल्टीकॉन कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी तनविन , यूनिटीचे कृष्णा लवटे , बंडु कसेकर शिवाजी सुरवसे नंदकिशोर पोतदार अदिजन उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!