गोरगरिबांच्या मृत्यूची सरकारला काहीच किंमत नाही का!– जितेंद्र आव्हाड
नागपूर येथील मेयो आणि मेडिकल या शासकीय रुग्णालयात मृत्यूंचा आकडा आता 60 च्या वर पोहचला आहे.
नांदेड शासकीय रुग्णालयात २४ तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झालाय.
या ठिकाणची थोडी माहिती घेतली असता,
- गेल्या ४ महिन्यापासून या रुग्णालयातील CT स्कॅन यंत्र बंद आहे.
- x-ray मशीन बंद आहे.
- रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे.
घाटी रुग्णालय (संभाजीनगर)
घाटी शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात १० रुग्णांचा मृत्यू झालेत.ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा,ठाणे येथे
एकाच दिवसांत २२ रुग्णांचा मृत्यू झालाय.
मृत्यू पावलेल्या लोकांचे आकडे पाहिले की अंगावर काटा येतोय.मागील काही दिवसात महिन्याच्या सरासरी पेक्षा जास्ती मृत्यू का होतायत..? यावर पुरेशी चर्चा होताना दिसत नाहीये.प्रथमदर्शनी पाहता,औषधांचा तुटवडा आणि सुविधांचा अभाव ही मुख्य कारण दिसत आहेत.
खरतर कळवा घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी “आरोग्य संचालकांच्या” अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली होती.त्याच काय झालं? हे अजूनतरी जनतेला समजलेले नाहीये.मुळात अश्या घटना घडल्यानंतर प्रशासन आणि सरकार जाग होत.अश्या समिती नेमल्या जातात.परंतु त्याच पुढं काय होत हे कळत नाही.ज्या लोकांनी आपले नातेवाईक,आप्तेष्ट सरकारी हलगर्जी मुळे गमावले आहेत..त्यांना किमान त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यूला नेमक कोण जबाबदार आहे..?हे तरी कळलं पाहिजे.खरतर तो त्यांचा हक्क आहे.
याच कळवा दुर्घटनेनंतर खरतर प्रशासनाने जागे होणे अपेक्षित होते. परंतू तानाजी सावंत (आरोग्यमंत्री) अजूनतरी जागे झालेत वाटत नाही. मला आठवत,कळव्यातील दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते की,
“सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होणे,हे माझ्यासारखा सेन्सिटिव्ह मंत्री सहन करणार नाही.”
त्यानंतर अजून 90-100 मृत्यू झालेत.गोर गरीब जनता रुग्णालयात जीव सोडतच आहे.प्रशासन गंभीर नाही.मला प्रश्न पडतोय की,हे आरोग्यमंत्री खरेच संवेदनशील आहेत का ??
राज्यात एकामागोमाग एक अनेक शासकीय रुग्णालयात मृत्यू होत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ ” कागल मध्ये आनंदाचा शिधा” वाटण्यात व्यस्त होते.माध्यमांनी यावर आवाज उठवल्या नंतर त्यांना जाग आलीय.
कोणताही प्रश्न त्यांना विचारल्यास ,
” माहिती घेऊन सांगतो, चौकशी करून सांगतो,” असे उत्तर देतात. इतक्या गंभीर घटना घडत असताना देखील ते याबाबत गंभीर दिसत नाहीत.इतके गंभीर प्रकरण घडत आहेत, परंतु याची जबाबदारी घेयची तयारी हसन मुश्रीफ , तानाजी सावंत तयार नाहीत. वेगवेगळी कारणे देऊन पळवाटा शोधत आहेत.
राज्य सरकारकडे ” शासन आपल्या दारी ” सारखे कार्यक्रम घेण्यासाठी करोडो रुपये आहेत परंतु शासकीय रुग्णालयांना द्यायला पैसे नाहीयेत का??का सगळे पैसे बेफान जाहिराती आणि आमदार खरेदीत खर्च झालेत ? या राज्यात गोर गरीबांच्या आयुष्याची काहीच किंमत नाहीये का..?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत