राज्यात महिलांवरील अत्याचारात मुंबई पहिल्या क्रमांकावर.

राज्यात महिलांवरील अत्याचारात मुंबई पहिल्या क्रमांकावर तर पुणे दुसऱ्या स्थानावर. विनयभंग, छेडखानी, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे तसेच महिलासंदर्भातील गुन्हे सातत्याने नोंदवल्या जात असून महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.हे राज्यासाठी अत्यन्त घातक असून राज्यकर्त्यांनी त्वरित सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांच्या गलथान कारभारांमुळेच आणि स्त्रियांना योग्य सौरक्षण न दिल्यामुळे राज्यामध्ये आणि देशामुळे स्त्री भ्रूण हत्या होत आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. परंतु, राज्यातील महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचार आणि विनयभंग, छेडखानीच्या घटना लक्षात घेता सरकारचा दावा फोल ठरत आहे. मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात मुंबईत विनयभंग, छेडखानीच्या १ हजार २५४ घटना घडल्या आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटीने जास्त आहे. याच कालावधीत ५४९ महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येसुद्धा दुप्पट वाढ झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत