महापरिनिर्वाण दिन
-
कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली , भीमांजली… वर्ष ९ वे !!!
बाबासाहेबांना संगिताची फार गोडी होती . आपणास चांगले गायन , वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडे अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरात शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या बुद्धं शरणं गच्छामिच्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतो. ७ स्वर , २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे . चर्म वाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घनवाद्य ह्यांची मोठी परंपरा भारतीय संगित क्षेत्राला आहे.बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगित संस्था दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणतात की डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपलयाला ध्यानधारणाच्या (विपश्यना) अवस्थेत नेते . भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामि च्या बासरी वादनाने सुरवात केली आणि त्यानंतर आजतागायत जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि , भीमराया घे तुला या लेकरांची वंदना , अशा वाद्य स्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात. यात प्रामुख्याने पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये…
Read More » -
क्रांतीसुर्याला विनम्र अभिवादन!
सहा डिसेंबर ते काळे ठरलेसुर्य विझला आकाश रडलेधरती भिजली सागर सुकलेहीन दीन जन कोटी तूटलेगहिवरले नयन घळघळलेकाजळ काळे मेघ दाटलेउदास…
Read More » -
परमपुज्य बाबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी प्रतिज्ञा
बाबासाहेब! तुम्ही नसता, तर कदाचित आजचे हे माणूसकीचे जीणे नशीबी आलेच नसते. माणूसच आपले नशीब घडवित असतो, हे बुध्दवचन आपण…
Read More » -
शांत चैत्यभूमी अभियान !
६ डिसेंबर १९५६ हा परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ! मानव मुक्तीच्या लढ्यातील हा एक सर्वाधिक दु:खदायक…
Read More » -
6 डिसेंबर आला आता,
संतोष कांबळे 6 डिसेंबर आला आता, आमचा अभिमान जागा होईल, निवडणूकीत विखुरलेला सारा समाज आता एक होईल,! डॉ, बाबासाहेबांचा विजय…
Read More » -
प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. प्रा.डॉ. उमाकांत राठोड
या देशांमधील राजकीय, समाजव्यवस्था ही जातीच्या आधारावर शोषण करणारी आहे. प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला…
Read More » -
नळदुर्ग शहरात प्रथमच राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजीच्या मठात सर्वधर्म समभाव कार्यक्रम होतोय संपन्न
सर्व जाती धर्माच्या नागरीकांना व पत्रकारांना एकत्र करून श्री ष ब्र बसवराज शिवाचार्य महास्वामी यांनी केला सन्मान सर्व मानव धर्म…
Read More » -
आज बिरसामुंडाच्या १४९ जयंतीच्या निमित्ताने अभिनंदन तयाच्या चरणावरती क्रांतिकारी पुष्प अर्पण
बबनराव मोरे क्रांतिकारी बिरसा मुंडा आज जयंती आहे, या आदिवासी समाजाचा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी सर्व माता भगिनी बंधु नवतरुण…
Read More » -
महापरिनिर्वाण दिनी “भीमलंगर” हवे !
परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी , दादर येथे लाखोंच्या संख्येने जनता येते. या…
Read More » -
भाजप आणि काँग्रेसला हरवायचे की जिंकू द्यायचे ?
🙏🙏 आंबेडकरी बांधवांनो भाजपाला हरवायचे का जिंकवायचे हे तुम्ही विचार पुर्वक ठरवा??आमचे सामाजिक राजकीय व संविधान संपविणारे,आरक्षण संपविणारे खरे शत्रु…
Read More »