दिन विशेषदेश-विदेशमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

गाडगेबाबांचा देव : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६४४०८७९४

‘०६ डिसेंबर या दिवसाचे भान मनी ते राहू द्या !
आनंदाचा नाही दिवस हा अरे बाबांनो समजून घ्या’

गाडगेबाबा प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जात पण ते कधीही विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाहीत. मग प्रश्न पडेल की गाडगेबाबा पंढरपूरला जाऊन तिथे जाऊन नेमकं करायचे तरी काय ? तर गाडगेबाबा तिथे जाऊन हातातील खराट्यांने दिवसभर चंद्रभागेचा किनारा स्वच्छ करायचे आणि रात्री त्याचं वारक-यांना एकत्रित करून त्यांच्या डोक्यातील अंधश्रद्धाळू विचारांची घाण काढण्यासाठी विज्ञानवादाचा वैचारिक घराटा मारून त्यांचं डोकं स्वच्छ करून म्हणतं की, ‘आजपर्यंत देव कोणं पहायला नाही, देव पहायची वस्तू नाही. पण जर देवचं माणायचं असेल तर डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर यांना देव माना कारण त्यांनी या देशाला राज्यघटना दिली’ असं किर्तनातून लोकांना सांगत कारण गाडगेबाबा हे देवळातील दगडी मुर्तीत शोधत नव्हते तर ते बाबासाहेबांमध्ये असलेला देव शोधून ते इतरांनाही दाखवत होते. गाडगेबाबांचा देव नेमका होता तरी कसा ? यावर कधी तरी बहुजन समाज विचार करणार आहे की नाही हा प्रश्न पडतो.
बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत प्रवेश मिळाला पण त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावं लागे तहान लागली तर पाणी पिण्याच्या भांड्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. तेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरूजी यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या सभेत गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट दिली होती. त्यानंतर केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी आंबेडकरांची भेट घालून दिली होती. तसेच गाडगेबाबांनी ज्यांना देव माणलं ते बाबासाहेब आंबेडकर दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर राजर्षी शाहु महाराजांनी हत्तीवरून साखर वाटली होती आंबेडकरांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी शाहू महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. ही गोष्ट बहुतांशी लोकांना माहीतच नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर आनंत मोरे म्हणतात की,
‘संसाराची पर्वा ना केली केवळ तुमच्यासाठी रे
सुख भोगले नाही भिमाने केवळ तुमच्यासाठी रे
जान तयाची तुम्हा आहे का ? विचारून हे मनास घ्या
आनंदाचा नाही दिवस हा अरे बाबांनो समजून घ्या !’
बाबासाहेब एक उत्तम संपादक पत्रकार होते त्यांनी १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना २००० रुपयांची आर्थीक मदत केली होती. तसेच १९१२ मध्ये त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली. त्यानंतर आंबेडकरांनी १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ते ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले त्यांनतर जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. त्यानंतर १९२५ मध्ये ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक लिहिले म्हणून दोषी मानले होते. देशभक्त केशवराव जेधे यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाची भूमिका पार पाडली होती. ‘देशाचे दुश्मन’ वरील खटल्यात जवळकरांच्या बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर १९२६ मध्ये केस लढवून त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली.
रामदासी स्वयंसेवक संघाचे काही बांडगूळ म्हणतात की, बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत येत नव्हती म्हणून त्यांना सांगावं वाटत की, बाबासाहेब आंबेडकरांना मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी भाषा, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक भाषा त्यांना अवगत असून त्यांचे त्यावर प्रभुत्व होते. बाबासाहेब म्हणत की, मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. म्हणून मंदीरात जाणा-या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील, त्यादिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
२० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवून सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने प्यायले, त्यानंतर आनुयायांनी त्यांचे अनुसरण केले. तेव्हा ‘अस्पृश्यांनी तळे बाटवले’ असे म्हणून त्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. तेव्हा प्रश्न पडतो की, मानवी विष्ठा खाणा-या गायीच्या विष्ठेपासून जर पाण्याचे शुद्धीकरण होत असेल तर ब्राम्हणांनीही बहुजनांच्या घरातील व्यक्तीसोबत जेवण करून नंतर गोबर गोमुत्र घेऊन स्वत:ला शुध्द करून घ्यायला काय अडचण आहे पण जोपर्यंत बहुजन समाज गाय गोबर या चक्रातून निघणार नाही तोपर्यंत हे मनुवादी लोक स्वत: गोबर गोमुत्राचे सेवण न करता इतरांना ते भक्षण करायला लावतील हे मात्र निश्चित. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय नसून तिरस्कारणीय होता. म्हणून मनुस्मृतीचे २५ डिसेंबर इ.स. १९२७ रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले. तेव्हापासून दरवर्षी ‘२५ डिसेंबर’ हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो. पण काही मोजक्या संघटना व त्यांचे कार्यकर्ते सोडले असता सुशिक्षित समजला जाणा-या इतरांना मनुस्मृती व मनुस्मृती दिन याविषयी काहीच माहिती नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे.
१४ जुलै १९४१ मध्‍ये संत गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्‍हती, ते मुंबईत होते. ही माहिती कायदेमंत्री बाबासाहेब समजताच ते दिल्‍लीला जाण्याऐवजी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून दोन घोंगड्या विकत घेऊन ते हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीच कोणाकडून काही घेत नसत, पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या. त्यावेळी
गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, ‘डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ‘बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.’ या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
‘संसाराची पर्वा ना केली केवळ तुमच्यासाठी रे
सुख भोगले नाही भिमाने केवळ तुमच्यासाठी रे
जान तयाची तुम्हा आहे का ? विचारून हे मनास घ्या
आनंदाचा नाही दिवस हा अरे बाबांनो समजून घ्या !’
स्त्रियांना हक्क व अधिकार मिळावेत म्हणून बाबासाहेबांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस अविरत कष्ट हिंदू कोड बिल संसदेत ०५ फेब्रुवारी इ.स. १९५१ रोजी मांडले तेव्हा अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला पण आजच्या सुशिक्षित माहीलांनाच माहीती नाही. म्हणून तर गीतकार अनंत मोरे म्हणतात की,
‘तरुण पिढीला कसा कळेना भिमरायाचा त्याग रे
स्वत:साठी जगणेना कधीही आठवा ते उपकार रे
वेळ पुन्हा ती आणू नका रे ध्यास मनी हा राहू द्या
आनंदाचा नाही दिवस हा अरे बाबांनो समजून घ्या !’
आज देशात सर्वधिक पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत अशी गिनीज बुकात तशी नोंद आहे. परंतु कोल्हापूरचा यात विक्रम आहे. डॉ. आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने भाई माधवराव बागल यांना वाटत होते की, फुले, आंबेडकरांपासून तरुणांना या शाहूनगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले. आणि ९ डिसेंबर १९५० ला त्यांचे हजारो लोकांसमोर अनावरण केले. आज संघाचे काही लोक जोरजोरात सांगतात की, डाॅ. हेडगेवार व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एकसारखे होते पण यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे म्हणतात की, हेडगेवारांसारखा काळाकुट्ट अंधार व सुर्यासारखे बाबासाहेब त्यामुळे अंधाराची व उजेडाची बरोबरी झालेली कोणी बघितली आहे का? तुमच्या मांडण्या आणि भुमिका काय आहेत. एकीकडे शोषण व विध्वंस तर दुसरीकडे समता बंधुता न्याय आहे.
गाडगेबाबांचा किर्तन करत असताना तार आली त्यात लिहलं होतं की, गाडगेबाबांचा एकुलता एक मुलगा मरण पावला तेव्हा गाडगेबाबांनी चेह-यावर कोणत्याही प्रकारचे दु:ख न दाखवत ‘ऐसें गेले कोट्यानकोटी काय रडू मी एकल्यासाठी’ म्हटले आणि किर्तन चालूच ठेवलं पण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ०६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीमध्ये निधन झालं होतं. ही वार्ता जेव्हा गाडगेबाबांनी रेडिओवर ऐकली तेव्हा मात्र ते ढसढसा रडले आणि तेरा दिवस अन्नत्याग केला होता. गाडगेबाबांचं बाबासाहेब आंबेडकरांशी असलेलं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ट होतं हे समजून घेतलं पाहिजे. ०६ डिसेंबर या दुःखद दिन ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून ओळखला जातो. म्हणून शेवटी आनंत मोरे हे त्यांच्या गीतातून म्हणतात की,
‘महापरिनिर्वाणदिनी या लाज कशी ही वाटेना
निळे कफन बांधुनी शिरावर मौज मजा ती करताना
काय साधता तुम्ही अनंता समाजदाबी करूनीया
आनंदाचा नाही दिवस हा अरे बाबांनो समजून घ्या
०६ डिसेंबर या दिवसाचे भान मनी ते राहू द्या
आनंदाचा नाही दिवस हा अरे बाबांनो समजून घ्या’

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!