
या केंद्रासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन मंजूर केली असून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत ही जागा ताब्यात घेऊन फलक लावण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने अंबाजोगाई शहरात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. पठाण मांडवा रस्त्यावर असलेल्या या जागेवर कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम सुरु केले जाणार असून, त्यासाठी केंद्र राज्यशासनाकडे २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात असल्याची माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत