मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

छत्रपती संभाजीनगर इथे दोन ठिकाणी अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू…

वाळूज औद्योगिक परिसरात मध्यरात्री एका कंपनीत भीषण आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाला. शाईन एन्टरप्रायजेस नावाच्या हातमोजे तयार करणाऱ्या या कंपनीत मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन आग लागली. छत्रपती संभाजीनगर इथं दोन भीषण अपघातांमध्ये नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
घाटी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मुदस्सर अन्सारी यांनी ही माहिती दिली. आगीतून सुमारे १५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं, तर होरपळलेल्या सहा कामगारांना घाटी रुग्णालयात नेण्यात आलं असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुसरा अपघात काल छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावर झाला. करमाड रस्त्यावर हिवरा फाट्यानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकीवरील तीन जण खाली पडले, मागून येणाऱ्या अवजड वाहनाने चिरडल्याने त्या तिघांचा मृत्यू झाला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!